महागाई वाढली, सोलापूर महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल

इंधनाची वाढती दरवाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईचा काँग्रेसकडून रोज निषेध केला जात आहे. (congress protest in solapur against fuel price hike)

महागाई वाढली, सोलापूर महिला काँग्रेसकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल
congress protest
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 2:02 PM

सोलापूर: इंधनाची वाढती दरवाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईचा काँग्रेसकडून रोज निषेध केला जात आहे. सोलापूरच्या महिला काँग्रेसनेही वाढत्या महागाईवर संताप व्यक्त करत थेट पंतप्रधान कार्यालयाला शेणाच्या गोवऱ्या पार्सल पाठवल्या आहेत. (congress protest in solapur against fuel price hike)

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसने सोलापुरात पेट्रोल पंपावर वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान असलेल्या 7 रेसकोर्सवर महागाईचा निषेध म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आमच्यावर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढल्याने युवकांची अडचण झाली आहे. सर्वसामान्यांवर लॉकडाऊनचे संकट असताना इंधन दरवाढ करून केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे आम्ही देशभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत, असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं.

मोदी मीडियासमोर यायला घाबरतात

कोरोना संकटात मोदी सरकारने योग्य नियोजन केलं असतं तर इतके लोक मृत्यूमुखी पडले नसते. सगळ्या बाजूने सरकारची कोंडी झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर मोदी सरकारची बोलती बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. ते मीडियासमोर यायला घाबरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

पटोलेंवर बोलण्यास नकार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मात्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास शिंदे यांनी नकार दिला. इंधन दरवाढ आणि महागाई आदी प्रश्नांवरच त्यांनी अधिक भाष्य करून पटोलेंचा विषय टाळला. (congress protest in solapur against fuel price hike)

संबंधित बातम्या:

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका, मला कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नानांचं पवारांकडे बोट?

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष, मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले : नाना पटोले

(congress protest in solapur against fuel price hike)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.