Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?

अकोला जिल्ह्यानं तापमान वाढीचा उच्चांक गाठला. अकोला शहर व जिल्ह्यातही तापमान कमी राखणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणकोणत्या पर्यावरणीय उपाययोजना राबवाव्या, यासाठी लवकरच पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम राबविण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?
अकोला येथील बैठकीत उपस्थित जिल्हाधिकारी व पदाधिकारी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 2:55 PM

अकोला : जिल्ह्यातील वाढते व उच्चांकी तापमान ही साऱ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे. याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी व पर्यावरणीय उपचार अंमलात आणण्यासाठी काय करता येईल? याबद्दल विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी मागणी केली. त्या मागणीनुसार, जिल्हाधिकारी (Collector Nima Arora) यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक के. अर्जून (Deputy Conservator of Forests K. Arjun), अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, हवामान केंद्राचे कार्तिक वानवे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे, मिलिंद शिरभाते, ए. एस. नाथन, उदय वझे, संदीप वाघाळकर, डॉ. संतोष सुरडकर, शरद कोकाटे, प्रभाकर दौंड, विशाल बोरे आदी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यानं तापमान वाढीचा उच्चांक गाठला. अकोला शहर व जिल्ह्यातही तापमान कमी राखणे आवश्यक आहे.

लोकचळवळ आवश्यक

कोणकोणत्या पर्यावरणीय उपाययोजना राबवाव्या, यासाठी लवकरच पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम राबविण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. हा प्रश्न भावी पिढ्यांच्या हितासाठी सोडवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. सर्व घटकांनी सर्व भेद विसरुन एकत्र येणे काळाची गरज असल्याचे या बैठकीत मिटकरी म्हणाले. उपवनसंरक्षक अर्जून यांनी अकोला जिल्ह्यातील तापमानाच्या उच्चांकी वाढीमागील शास्त्रीय कारणे सांगितली.

वृक्षरोपनाची व्यापक मोहीम

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्याचे वृक्षआच्छादन वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष रोपनाची व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. जमिनीची उपलब्धता करणे, ई- क्लास जमिनींची माहिती घेणे. त्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करून लागवड करणे गरजेचे आहे. लावलेल्या वृक्षांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध करू द्यावे लागेल. भूजलस्तर उंचावणे, जलाशयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. झाडांचे संरक्षण करणे याबाबत दीर्घकाळ उपाययोजना कशा करता येतील, यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येईल. दरमहा आढावा घेण्यात येईल, असे निर्देश ही यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा बैठकीत असलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Wardha Crime | वर्ध्यात ऐन विशीत, गुन्हेगारीच्या कुशीत! कारागृहात 25 टक्के बंदिवान 20 ते 35 वयोगटातील

Bhandara Crime | भंडाऱ्यात मुलीसोबत बोलण्याचा वाद, मिरचीपूड टाकून युवकाला संपविले, पाच जण अटकेत

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.