पालघर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये आढळला पहिला रुग्ण

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आला होता. डहाणू तालुक्यात या विषाणूचा रुग्ण सापडला होता.

पालघर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वीच डेल्टा प्लस कोरोना विषाणूचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये आढळला पहिला रुग्ण
CORONA
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:22 PM

पालघर : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आला होता. डहाणू तालुक्यात या विषाणूचा रुग्ण सापडला होता. त्याची लक्षणे वेगळ्या प्रकारची आढळल्यामुळे तसा संशय लक्षात घेता तो विषाणू कोणत्या प्रकारचा आहे, हे तपासण्यासाठी त्या रुग्णांचे नमुने दिल्लीच्या सीएसआयआर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. नंतर या रुग्णाला डेल्टा प्लस कोरोना विषाणूनची लागण झाल्याचे समोर आले होते. (Corona delta plus patient was found before two months in Palghar district)

नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

डेल्टा प्लस विषाणूचा नमुना आढळल्यामुळे एप्रिल महिन्यातच डहाणू तालुक्यातील सर्व रुग्णांचे नमुने तसेच या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे नमुने घेण्यात आले होते. तसेच या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र सुदैवाने ते नमुने निगेटिव्ह आढळले होते. या विषाणूचे संक्रमण वेगाने होत असले चिंतेचे कारण नसल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र केळकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिह्यातही आढळला डेल्टा प्लस कोरोनाचा रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेल्टा प्लस या कोविड 19 प्रकारातील पहिला रुग्ण कणकवली-परबवाडी येथे आढळला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्या रुग्णावर घरीच उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. परबवाडा येथे कंटेन्मेंट झोन घोषित करून या परिसरातील दोनशे लोकांचा सर्व्हे सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. मात्र ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात येऊन डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. त्यामुळे तो रुग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आला आणि त्या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले याचा शोध घेण्यात येत आहे. या रुग्णाचे इतर नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र हे नातेवाईकांना डेल्टा प्लस या कोरोना निषाणूची लागण झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं वार्ष्णेय यांनी सांगितलं.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

इतर बातम्या :

मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?

Maharashtra News LIVE Update | जहाल महिला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, शासनाने ठेवले होते 6 लाख रुपयांचे बक्षीस

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात 24 तासात 10 हजार 66 नवे कोरोनाबाधित, 163 रुग्णांचा मृत्यू

(Corona delta plus patient was found before two months in Palghar district)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.