‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील सतर्क, आता थेट व्हॅनिटीमधूनच प्रवास; कशी आहे गौतमी हिची व्हॅनिटी व्हॅन?

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी सतर्क झाली आहे. गौतमीने आता खबरदारी म्हणून व्हॅनिटी व्हॅनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील सतर्क, आता थेट व्हॅनिटीमधूनच प्रवास; कशी आहे गौतमी हिची व्हॅनिटी व्हॅन?
Gautami PatilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 11:51 AM

सोलापूर : सबसे कातील गौतमी पाटील अशी अल्पावधीत ओळख मिळवलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने तिच्या नृत्यावरच टीका केली गेली. गौतमी अश्लील नृत्य करते अशी तिच्यावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर गौतमी अडचणीत आली. तिने या प्रकाराबद्दल जाहीर माफीही मागितली. त्यानंतर तिने आपल्या नृत्यात बदलही केला. पण तिच्यावरील टीका काही कमी झाली नाही. ही टीका सुरू असतानाच गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि गौतमीच्या पायाखालची वाळूच सरकली. या प्रकरणी तिने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौतमी सतर्क झाली. त्यानंतर हा प्रकार टाळण्यासाठी तिने आता थेट व्हॅनिटी व्हॅनचाच वापर सुरू केला आहे.

प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. रोज नवीन वादात अडकणाऱ्या गौतमीची पाठ काही वाद सोडायला तयार नाही. एक घृणास्पद घटना घडली.तिचे कपडे बदलतानाची क्लिप एका विकृताने व्हायरल केल्याने तिला धक्काच बसला. प्रसिद्धीच्या हवेत असतानाच ती पार कोलमडून गेली. मात्र तिची आई आणि सोबतच्या सहकार्यांनी तिला सावरले. या प्रकरणी तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

विकृत घटनेपासून धडा

गौतमीचे महाराष्ट्रभर कार्यक्रम असतात. प्रत्येक ठिकाणी चांगली व्यवस्था असतेच असे नाही. बहुतेक ठिकाणी तर स्टेजच्या बाजूलाच चार पडदे टाकून एक रुम तयार करण्यात आलेली असते. या ठिकाणीच नृत्यांगना दुसरे कपडे परिधन करून स्टेजवर नव्या गाण्यावर अदाकारी करायला येतात. प्रत्येक गाण्याच्यावेळी या नृत्यांगना कपडे बदलून येत असतात. गौतमीही त्याला अपवाद नव्हती. पण एका विकृताने तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल केला. त्यामुळे गौतमी आणि तिचा मंच खडबडून जागा झाला.

घटना वारंवार घडू नये म्हणून

अशा घटना वारंवार घडू नये. सोबतच्या इतर कोणत्याही कलाकाराबाबत असा प्रकार घडू नये म्हणून गौतमीने व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात. शिवाय कलाकरांसाठी ही व्हॅन अत्यंत सुरक्षित असते. मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंतचे कलाकार या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करतात. त्यामुळे गौतमीनेही व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. जिथे जिथे ती कार्यक्रमाला जाते तिथे ती व्हॅनिटी व्हॅनची मागणी करत असते. तसेच संरक्षणासाठी तिने बाऊन्सरही ठेवले आहेत.

व्हॅनिटी व्हॅन नसेल तर …

आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनच्या व्यवस्थेची मागणी करत आहोत. काही लोक आम्हाला व्हॅनिटी व्हॅन पुरवतही आहेत. ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी किमान कपडे बदलण्यासाठी चार भिंतीची बंदिस्त खोली तरी द्यावी अशी आमची माफक अपेक्षा आहे, असं गौतमी सांगते. त्या विकृत घटनेनंतर आता गौतमी सावरलीही आहे आणि सावध झाली आहे. आता तिच्या कार्यक्रमावेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होऊनच ती स्टेजवर जाते.

काय काय सुविधा?

या छोट्याश्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सर्व सुविधा असतात. टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, एसी, बेड, जीमचं साहित्य, टॉयलेट, बाथरूम, कपडे बदलण्यासाठी रुम, आराम करण्यासाठी गादी, झोपण्याची व्यवस्था, मेकअप रुम आदी सर्व सुविधा या व्हॅनमध्ये असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.