पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द

आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या, अशी चर्चा जिल्हाभरात रंगली होती.

पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द
दीपक मुगळीकर, आंचल गोयल
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 7:39 AM

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर शनिवारी निवृत्त झाले. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती झाली होती. त्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार होत्या. त्यासाठी आंचल गोयल दोन दिवसांपूर्वीच परभणीत आल्या, परंतु रुजू होण्याच आधीच त्यांची बदली रद्द करण्यात आली. त्यांची बदली का आणि कुणी रद्द केली याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. आंचल गोयल या डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या, अशी चर्चा जिल्हाभरात रंगली होती.

नेमकं काय घडलं?

परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाच्या काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत श्रीमती गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जाते. यात या मंडळीना यश आले असून आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार द्यावा, असे आदेश सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार

जिल्ह्यात दिवसभर या प्रकरणाची चर्चा होती. पत्रकारांनी थेट पालकमंत्र्यांनाही याबाबत विचारणा केली. मात्र पालकमंत्र्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देण्याचे पत्र हे 30 जुलैचे आहे. अखेर, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आपला पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली.

संबंधित बातम्या :

IAS Transfer : राज्यातील आणखी 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर

पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांची बदली, पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर

औरंगाबाद शहर पोलिसातील 560 कर्मचाऱ्यांची बदली, पीएसआय ते आयुक्त सर्वांचा नंबर लागणार?

(Dashing IAS Officer Aanchal Goyal transferred as Parabhani collector cancelled later)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.