VIDEO: दादा, इथं काही तरी बोला की, अहो जनतेला काय ते कळलं पाहिजे; भिलवडीकरांचा अजितदादांना आग्रह
दादा, इथं काही तरी बोला की, अहो जनतेला काय ते कळलं पाहिजे... असा आग्रहच भिलवडीकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला. (ajit pawar)
सांगली: दादा, इथं काही तरी बोला की, अहो जनतेला काय ते कळलं पाहिजे… असा आग्रहच भिलवडीकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला. अजितदादा आज भिलवडीच्या निवारा केंद्रात आले होते. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस केली. तेव्हा, पूरग्रस्तांनी अजितदादांकडे हा आग्रह धरला. (DCM Ajit Pawar met flood affected people in sangli)
अजित पवार आज सकाळीच भिलवडी येथे दाखल झाले. भिलवडीत प्रचंड पूर होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे. अजितदादांनी थेट या निवारा केंद्रातच जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. नागरिकांची विचारपूस केल्यानंतर अजितदादा सांगलीकडे जायला निघाले. तेव्हा निवारा केंद्राबाहेर प्रचंड गर्दी होती. या पूरग्रस्त या ठिकाणी जमले होते. त्यावेळी एका पूरग्रस्ताने दादा, इथे काही तरी बोला की, बोला की. अहो जनतेला काय ते कळलं पाहिजे, असा आग्रह धरला. तर दुसऱ्या पूरग्रस्ताने पुराचं नियोजन चांगलं झालं आहे. पण पाण्याचं नियोजन करायला हवं होतं, असं सांगितलं.
भेदभाव करणार नाही
यावेळी अनेकांनी आमची घरं पाण्यात गेली. आम्हाला काही तरी तातडीने मदत करा, असं साकडं अजितदादांना घातलं. त्यावेळी चालता चालताच अजितदादांनी त्यांच्याशी संवाद साधला. सर्व शेतकरी, पत्रकार आणि सर्व क्षेत्रातील लोकांसाठी आम्ही निर्णय घेणार आहोत. कुणाशीही भेदभाव करणार नाही. तुम्ही आहात, इतरही आहेत. सर्वांनाच मदत देऊ. आम्ही नाही म्हणतच नाही, असं अजितदादा म्हणाले.
महापुराचं पाणी नेहमी येतं का?
अजितदादांनी निवारा केंद्रातील लोकांशी संवाद साधला. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली. निवारा केंद्रात तुम्हाला जेवण मिळतं का? केंद्रातील व्यवस्था चांगली आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसेच लहान मुलांना जवळ बोलावून तुम्ही शाळेत जाता का? अशी चौकशीही त्यांनी केली. (DCM Ajit Pawar met flood affected people in sangli)
संबंधित बातम्या:
LIVE : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, कोयनानगरात खराब हवामान, उद्धव ठाकरे पुन्हा पुण्यात
खराब हवामानाचा फटका, अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द
शाळेला जातो का?, जेवण मिळते का?; अजित पवारांकडून पूरग्रस्तांची विचारपूस
(DCM Ajit Pawar met flood affected people in sangli)