औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू
औरंगाबाद पैठण रोडवरील गेवराई गावाजवळ शेतात विजेची तार कोसळून 7 ते 8 गाई मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.
औरंगाबाद : औरंगाबाद पैठण रोडवरील गेवराई गावाजवळ शेतात विजेची तार कोसळून 7 ते 8 गाई मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. गेवराई गावातील अलाना कंपनीच्या मागे असलेल्या परिसरात ही घटना घडली. वादळी वाऱ्यात जमिनीवर कोसळलेल्या विजेच्या तारा वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
या घटनेत गरीब शेतकऱ्यांच्या 7 ते 8 गाईंचे हकनाक प्राण गेले आहेत. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
आधीच शेतकरी संकटात असताना लॉकडाऊनने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. काबाड कष्ट करुनही शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला गाई व्यवसायातून आधार मिळतो. मात्र, अशा अपघाताने पीडित शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. त्यामुळे वीज महामंडळ आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
PHOTO : यवतमाळमध्ये वाघिणीचा चार बछड्यांसह गायीवर हल्ला
16 तासाच्या बचावकार्यानंतर 15 फूट चिखलात अडकलेल्या दोन गाई आणि एका वासराची सुटका
गोमांसाच्या संशयावरुन झाडाला बांधून बेदम मारहाण
व्हिडीओ पाहा :
Death of 8 Cows in Aurangabad due to electricity shock in farm