पाचच मिनिटं एकत्र भेटले; देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरीत एकत्र भेटले. अवघे पाचच मिनिटं या दोन्ही नेत्यांची भेट झाली. (devendra fadnavis reaction after cm uddhav thackeray meeting in kolhapur)

पाचच मिनिटं एकत्र भेटले; देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 1:25 PM

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरीत एकत्र भेटले. अवघे पाचच मिनिटं या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. प्रचंड गोंगाट होता. या भेटीत फडणवीसांनी थोडक्यात कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची माहिती देतानाच कोल्हापूरसह राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाँग टर्म प्लान करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (devendra fadnavis reaction after cm uddhav thackeray meeting in kolhapur)

शाहूपुरीतील बाजारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. या भेटीनंतर फडणवीसांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. आमची भेट झाली. तातडीची मदत दिली पाहिजे. लाँग टर्मच्या संदर्भात आम्ही एक प्लान केला होता. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही एक बैठक बोलवा. त्यावर त्यांनी लाँग टर्मचाच विचार करणार असल्याचं सांगितलं. तशा प्रकारची बैठक बोलवण्यावरच आमची चर्चा झाली, असं फडणवीस म्हणाले.

मी तिथेच फडणवीसांना भेटतो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पाहणी करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की, देवेंद्र फडणवीस यांना मी तिथेच भेटतो. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट करून दिली. या भेटीत फक्तं पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतेय.

एकमताने ठराव करा, पुनर्वसन करू

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी 2019 चा पूर , सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली. (devendra fadnavis reaction after cm uddhav thackeray meeting in kolhapur)

संबंधित बातम्या:

VIDEO: मुख्यमंत्र्यांचा निरोप, फडणवीसही थांबले, शाहुपुरीत एकत्र पहाणी, दोघांच्या भेटीची इनसाईड स्टोरी

VIDEO | कोल्हापुरात उद्धव-फडणवीस पहाणी करता करता एकमेकांना समोरा समोर भेटले

PHOTO | ‘हे आनंदाचे क्षण आयुष्यभर टिकून राहतील जर…’, सोशल मीडियावर दिसला राजेश्वरीचा चिलिंग मूड!

(devendra fadnavis reaction after cm uddhav thackeray meeting in kolhapur)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.