AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devi Mahakali | चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा आजपासून, दोन वर्षांनंतर घेता येणार भाविकांना दर्शन

चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा 7 एप्रिलपासून होणार सुरू होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना मनमोकळेपणाने दर्शन घेता येईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवी महाकालीच्या दर्शनासाठी लाखो भाविक चंद्रपुरात दाखल होतात. चैत्र नवरात्र निमित्त महिनाभर देवी महाकालीच्या यात्रेनिमित्त शहरात श्रद्धेचा सागर असेल.

Devi Mahakali | चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा आजपासून, दोन वर्षांनंतर घेता येणार भाविकांना दर्शन
चंद्रपूरची चांदागड देवीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 4:56 AM

चंद्रपूर : चांदागडची आई या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या देवी महाकालीची ( Devi Mahakali) यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी अर्थात सात एप्रिलपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र- तेलंगणा- आंध्रप्रदेश -छत्तीसगड या राज्यातून लाखो भाविक महाकाली देवीच्या दर्शनासाठी या काळात चंद्रपुरात दाखल होतात. जिल्हा प्रशासन (District Administration) व मंदिर व्यवस्थापन (Temple Management) दोन वर्षाच्या कालावधीनंतर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सज्ज झाले आहे. चंद्रपूरच्या चांदागड देवीची यात्रा 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनाकाळानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांना या ऐतिहासिक देवस्थानातील महाकाली मातेचे मनमोकळेपणाने दर्शन घेता येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवी महाकालीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या काळात चंद्रपुरात दाखल होतात. चैत्र नवरात्र निमित्त महिनाभर देवी महाकालीच्या यात्रेनिमित्त शहरात श्रद्धेचा सागर असतो.

दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे

जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारल्या आहेत. पाणी- शौचालय -निवास- आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. चंद्रपूरचा उच्चांकी उन्हाळा लक्षात घेता दर्शन रांगेत भाविकांसाठी फवारे लावण्यात आले आहेत, अशी माहिती महाकाली मंदिराचे विश्वस्त पुजारी सुनील महाकाले तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

भक्तांना आस महाकाली देवीच्या दर्शनाची

यात्रेच्या निमित्ताने चंद्रपुरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. चैत्र पौर्णिमेचा दिवस यात्रेचा सर्वात मोठा दिवस असतो. त्यादरम्यान शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. भक्तांच्या स्वागतासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले आहेत. राज्यभरातील देवी भक्तांना आता महाकाली मातेच्या दर्शनाची आस लागली. जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक सोयी सुविधा केल्या आहेत. पाणी- शौचालय -निवास- आरोग्य यासह विविध सोयी-सुविधांसाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. शहरातील शेकडो सामाजिक संस्थाही लाखो भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहतील.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, वाईट काळ लांबच राहील

श्री हरी विठ्ठल ! सावळ्या विठूरायाला चंदनाचा थंडावा, मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न

National Calendar | आता एकच सण दोन दिवस साजरा होणार नाही, केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल, राष्ट्रीय दिनदर्शिका बनणार!

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....