ना शाळा, ना भिंती, पालावरच्या मुलांना मोफत अभ्यासाचे धडे; धनंजय मुंडेंचा संकल्प सत्यात

बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाने पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी 'मिशन डायरेक्ट अ‍ॅडमिशन' ही संकल्पना राबवली आहे.

ना शाळा, ना भिंती, पालावरच्या मुलांना मोफत अभ्यासाचे धडे; धनंजय मुंडेंचा संकल्प सत्यात
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 3:56 PM

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा सामाजिक न्याय विभागाने पालावर राहणाऱ्या, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, भिक्षा मागणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ‘मिशन डायरेक्ट अ‍ॅडमिशन’ ही संकल्पना राबवली आहे. यांतर्गत हजारो मुलांना समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षणाची या मुलांकडे सोय होऊ शकत नसल्याने सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील शिक्षक थेट पालांवर जाऊन या मुलांना शालेय शिक्षण देत आहेत. (Dhananjay Munde did Arrangement of education of children without home and internet)

पाल, वीट भट्टी, आदी ठिकाणी जाऊन कोणत्याही भिंती, शाळा हे बंधन तोडून ही मुले जागा मिळेल तिथे, अगदी मंदिरात, खुल्या मैदानात ज्ञानार्जन करत आहेत. धनंजय मुंडे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मागील महिन्यात समाज कल्याण विभागाने मिशन डायरेक्ट अ‍ॅडमिशन राबवून समाज कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमध्ये हजारो मुलांचे पाल-वस्त्यांवर जाऊन अ‍ॅडमिशन केले, परंतु सध्या शाळा बंद आहेत. तर दुसरीकडे या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करणेदेखील जिकिरीचे आहे. याचाच विचार करून मंत्री मुंडे यांच्या संकल्पनेचा विस्तार करत आश्रम शाळेतील शिक्षक या पाल-वस्त्यांवर जाऊन मुवांना शिक्षण देत आहेत.

विभागाच्या आश्रम शाळा सुरू होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. तसेच जिल्ह्यात आणखी अशी मुले कुठेही शिक्षणापासून वंचित असतील तर बीड जिल्हा सामाजिक न्याय भवन येथे संपर्क करून माहिती द्यावी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.

इतर बातम्या

मागच्या भेटीत जेव्हा शरद पवार मोदींना भेटले त्यावेळेस काय झालं होतं? आताही तशीच ‘ऑफर’ असेल?; वाचा सविस्तर

पवार-मोदी भेटीत नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच; दरेकरांनी दिली हवा

अमित ठाकरेंकडे मनसे विद्यार्थी सेनेची धुरा?; अमित ठाकरे, संदीप देशपांडे राज यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये दाखल

(Dhananjay Munde did Arrangement of education of children without home and internet)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.