कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नका, नंदुरबारच्या पालकमंत्र्यांचे विद्युत कंपन्यांना आदेश
जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विद्युत वितरण कंपन्यांनी या हंगामात ग्रामीण भागात कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट करु नय, असे निर्देश पाडवी यांनी दिले आहेत.
नंदूरबार : वीजबील थकल्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील वीजतोडणी करण्यात येत आहे. विद्युत निर्मिती कंपन्या आणि सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांत मोठा असंतोष निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नंदूरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विद्युत वितरण कंपन्यांनी या हंगामात ग्रामीण भागात कुठल्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट करु नये, असे निर्देश पाडवी यांनी दिले आहेत.
पाडवी यांची विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात जिल्ह्याचे पालक मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असल्यामुळे पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश दिले.
वीज कनेक्शन तोडू नयेत, भाजपची मागणी
शेतकरी आधीच संकटात आहे. त्यामुळे अंतिम संकटात नसावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री पाडवी यांनी शेतकऱ्यांची वीजजोडणी न तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक महिन्यांपासून वाढीव वीजबील तसेच शेतकऱ्यांची वीजतोडणी या मुद्द्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. कापणी, काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. असे असताना शेतकऱ्यांकडून थकित वीजबिलाची वसुली केली जातेय. याच कारणामुळे भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केलेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांची वीजतोडणी करु नये, अन्य़था राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असा इशार भाजपने यापूर्वी दिला होता. वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने राज्यभरात आंदोलनदेखील केले होते.
विद्युत वितरण कंपन्या आदेशाचे कितपत पालन करणार
दरम्यान, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि विरोधकांची मागणी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नंदूरबारमध्ये पाडवी यांनी मोठा निर्णय घेतलाय. असे असले तरी या निर्णयाचे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कितपत पालन करतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या :
पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार
पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
LK Advani Birthday : ‘हॅप्पी बर्थडे अडवाणीजी’, मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव