सगळंच पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका, दादांनी दरडावलं, शाळा कधी सुरु होणार? दादा म्हणतात..
काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
पुणे : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. केंद्राने सुद्धा खबरदारी घेण्यास सांगितले होते. केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
याशिवाय शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं.
अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.
काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.
अजित पवार मीडियावर भडकले
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले. राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हमाले. धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.
काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.
राजू शेट्टी यांचा पत्ता कट आणि हेमंत टकले यांना संधी याही बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
शाळांचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. यावर आंदोलन करून काही पक्ष काहीजण राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार आहोत. दिवाळी पूर्वी शाळा सुरू कराव्यात किंवा नंतर असे 2 मतप्रवाह आहेत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.
VIDEO : अजित पवार काय म्हणाले?
संबंधित बातम्या
मराठवाड्यात अतिवृष्टी, तात्काळ पंचनामे करण्याच्या अजित पवारांच्या सूचना
एसटी कामगारांना पगार मिळणार?, अजितदादांनी एसटी महामंडळाला दिले 500 कोटी