VIDEO : डोन्ट से धीस… नो कमेन्ट्स… नाही तर मी निघून जाईन; नारायण राणें को गुस्सा क्यू आता है
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ता आल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणेंनी राजकीय टोलेबाजी केली.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ता आल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणेंनी राजकीय टोलेबाजी केली. मात्र, भाजप नेते नितेश राणे यांच्याविषयी विचारताच राणे भडकले. एक दोनदा नव्हे तर चार पाच वेळा राणे भडकले. डोन्ट से धीस…नो कमेन्ट्स आणि नाही तर मी निघून जाईन, अशी विधाने नारायण राणे यांनी केली. त्यामुळे
सुरुवातीलाच राणेंची वॉर्निंग
नारायण राणे पत्रकार परिषदेला आले. त्यावेळी विजयी उमेदवारांशी ते हास्यविनोद करताना दिसले. मात्र, पत्रकार परिषद सुरू होताच राणेंनी पत्रकारांना वॉर्निंग दिली. आपसात बोलू नका तुम्ही. एकदा सुरू झालं की संपेपर्यंत बोलू नका, असं राणे भडकतच म्हणाले.
नो कॉमेन्ट्स… नाही तर थांबेन
राजन तेली यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेलींचा राजीनामा स्वीकारणार का? असा सवाल राणेंना केला तेव्हा राणे दुसऱ्यांदा भडकले. तुम्ही तोच तोच मुद्दा उपस्थित केला तर मी नो कॉमेन्ट्स म्हणेल आणि पत्रकार परिषद संपवून टाकेन. ऐकून घ्या. त्याचं उत्तर द्यायचं की नाही, असं राणे संतप्त होत म्हणाले. त्यानंतर त्यांनी तेलींचा राजीनामा स्वीकारायचा की नाही हे पक्षाचे अध्यक्ष ठरवतील. अध्यक्ष जो निर्णय घेतील. तो आम्ही मान्य करू. पण राजनला असं ठेवणार नाही. दिल्लीपर्यंत आमची सत्ता आहे. त्यांची कुठे तरी वर्णी लावू, असं राणे यांनी स्पष्ट केलं.
अजून एक केस हवीय का?
नितेश राणे जामीन फेटाळला. पण तुमची प्रतिक्रिया आली नाही, असं विचारलं तेव्हा राणे तिसऱ्यांदा भडकले. नाही नाही. तो कोर्टाचा अधिकार आहे. तुम्हाला माझी प्रतिक्रिया पाहिजे आहे का म्हणजे अजून एक केस. काही लोक प्रयत्न तेच करत आहेत. काही पत्रकारांचं तेच इंटेन्शन आहे, असा आरोप राणेंनी केला.
डोन्ट से धीस
एका पत्रकाराने नितेश राणेंबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नितेश राणे प्रकरणात… असं या पत्रकाराने उच्चारताच राणे संतप्त झाले. प्रकरण म्हणू नको, डोन्ट से धीस. प्रकरण कसले रे? ती जखम कसली आहे तू दाखवतो का? तो फिर्यादी हात बांधतो. हाताला जखम आहे? कधी विचारला प्रश्न तुम्ही हात असा का बांधतो? बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून पट्ट्या बांधून यायचं असं… अरे खरचंटलंय ते. आणि तो काय सत्कार… अर्थमंत्री येतात सत्काराला. काय मार खाल्लास रे कमी. अजून खायला पाहिजे होता. काय आहे हे…, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
सर्वांना पुरुन उरलोय
तुम्हालाही नोटीस दिली होती चौकशीसाठी… असं एका पत्रकाराने विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा राणेंनी त्याचा प्रश्न मध्येच तोडला. मग काय करायचं? कुणाची चौकशी? तुम्ही जा मदतीला त्यांच्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी सर्वांना पुरून उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलो. मध्ये नाही थांबलो कुठे मी. समजलं ना… त्यामुळे अशा 160 बीठ चौकश्या… मला काय नाही फरक पडत, असं ते तावातावाने बोलत होते.
मला नको सांगू… मी पण एक पत्रकार आहे
पण या नोटीशीत काही तथ्य आहे का? तुम्हाला कोणी बोलायला आले होते का? असा सवाल केल्यावर राणेंचा पारा अधिकच चढला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनाच फैलावर घेतलं. एक तुम्हाला सांगतो… मला नो कॉमेन्ट्स… अशा चर्चेला मी उत्तर नाही देऊ शकत. पाहिजे तर विचारा, नाही तर मी चाललो. दुसरं काही नाहीये का… नारायण राणे… नितेश राणे याच्यापलिकडे नाय विचारायला होतं. काय बँकेचं विचारलं?… मी सिंधुदुर्गाचं नाही, महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व करत आहे. मी केंद्रीय मंत्री आहे (हातावर लिहून दाखवत) हांहां… आम्हाला काही प्रतिक्रियेची गरज नाही. प्रतिक्रिया म्हणजे काय चांगलूपणा? प्रतिक्रिया म्हणजे बदनामीच… आम्ही आमची बाजू सांगत बसणं… असं झालं… तसं झालं… काय झेंडा दाखवला का तुम्ही? अरे मला नको सांगू… मी पण एक पत्रकार आहे… आहे ना पत्रकार… प्रहार आहे आमचा… आदर म्हणजे काय… मी आदर करतो… सत्कार करतो मी तुमचा… आदर म्हणजे काय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मी काय ज्योतिषी आहे का?
त्यानंतर त्यांना आणखी एक प्रश्न विचारला गेला. महापालिका निवडणुकांचा. राज्यात काही शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहे. कोण जिंकेल या निवडणुकीत? असा सवाल त्यांना केला. त्यावरही राणेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अरे हे संपू दे ना… कोण असेल..? म्हणजे काय..? मी काय ज्योतिषी आहे का? असा सवालच त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप