तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधी

महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार असून यंदा कोरोना संकट असल्याने मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधी
तुळजाभवानी माता
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 2:22 PM

तुळजापूर : महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार असून यंदा कोरोना संकट असल्याने मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.

मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे. हा उत्सव 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मात्र कोरोनाचे सावट असल्याने भक्तांना प्रवेश मिळणार नसल्याने भविकात नाराजीचा सूर आहे तर उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने पुजारी व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

मंदिर बंद पण विधी परंपरेनुसार साजरे केले जाणार

मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहेत.29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत.

7 तारखेला घटस्थापना

शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.७ ऑक्टोबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे.  मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकासाठी बंद केल्या होत्या. त्यामुळे देवी दर्शनासाठी भाविक तुळजापुरला येऊ शकले नव्हते.

असे असणार कार्यक्रम

8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.

तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सव काळात सर्व विधी तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजारी मंडळाच्या मदतीने करणार आहे.

(Due to Corona,Tuljabhavani Navratra festival will have to be celebrated without devotees this year)

हे ही वाचा :

Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाचं विसर्जन, फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, नागरिकांसाठी विसर्जन लाईव्ह दाखवणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.