AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जाहीर केली शाळांना सुटी

18 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. 19 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये.

विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जाहीर केली शाळांना सुटी
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 9:59 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या सोबतच सावली तालुक्यातील चारगाव नदीला पूर आला आहे. काल रात्री सावली तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चारगाव येथील पुलावरून नदीचं पाणी वाहत आहे. 18 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.

आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय यांना 19 जुलै 2023 रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले. नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागभीड-नागपूर मार्गावरील वाहतूक बंद

पुलावरून पाणी जात असल्याने सावली ते चारगाव, भारपायली, मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. नागभीड तालुक्यातील बामनी एमआयडीसीजवळ रस्त्यावरून नाल्याचे पाणी जात असल्याने नागभीड-नागपूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बामनी एमआयडीसीजवळ असलेल्या छोट्या पुलावरून नाल्याचं पाणी जात होते. त्यामुळे नागभीड-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 D वरील वाहतूक बंद झाली आहे.

नागपुरातही जोरदार पाऊस

नागपुरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. नागपूर हवामान विभागाने विदर्भात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केला. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत जोरदार पावसाला सुरुवात झाली. विदर्भात मान्सून उशिरा दाखल झाल्याने निर्माण झालेली तूट भरून निघणार आहे. 18 टक्केच्या जवळ पावसाची तूट आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा हा पाऊस ठरणार आहे.

वाशिममध्येही मुसळधार

वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे विहिरी, विंधन विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. जर सलग असाच पाऊस पडला तर नुकतीच अंकुरलेली खरिपाची सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे.

भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.