Video Chhagan Bhujbal on ED | ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका विवाह कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनंतर पत्रकारांशी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ईडी हा राक्षसी कायदा आहे. तो रद्द झाला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.
अकोला : ईडी (ED) हा राक्षसी कायदा आहे. तो बदलण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न पुरवठा मंत्री (Food Supply Minister) छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते अकोल्यात एका विवाह सोहळ्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी सांगितल्याशिवाय ईडीची धाड पडत नाही. भाजप वाल्यानी सांगितलं की, हा भाजपमध्ये आलाय. तर ईडीची कारवाई नाही. मात्र भाजपच्या (BJP) विरोधात बोलतोय. तेव्हाच मात्र ईडीची धाड पाडली जाते. म्हणजे भाजप सांगेल त्याप्रमाणे ईडी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर ईडी या कायद्यात जामीन मिळत नाही. हा राक्षसी कायदा आहे. हा सर्वांनी म्हणजेच विरोधकांनीही एकत्र येत रद्द करण्याची, मागे घेण्याची गरज असल्याचे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले.
तुकाराम बिडकरांची घेतली भेट
आज अकोल्यात माझी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या मुलीच्या लग्न समारंभात छगन भुजबळ हे आले होते. यावेळी त्यांनी अकोल्यातील माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या घरी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, मला वाटते ईडी म्हणजे राक्षसी कायदा आहे. ते लवकरात लवकर बंद केलं पाहिजे, असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केलं. ईडीच्या कायद्यानं बरेच जण अडचणीत येतात. सूडबुद्धीनं याचा वापर केला जातो. त्यामुळं हा कायदा रद्द करण्याची गरज आहे, असंही भुजबळ म्हणाले.
पाहा व्हिडीओ
अकोल्यात छगन भुजबळ म्हणाले, ईडी हा राक्षसी कायदा… pic.twitter.com/CCkRhYCNW1
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 7, 2022
केंद्राकडून ईडीचा गैरवापर
सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं भाजपला वाटेल तेव्हा ते ईडीचा वापर करून घेतात. त्यामुळं गुन्हे नसतानाही विनाकारण त्रास दिला जातो. केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात कुणी गेला की, लगेच ईडी मागे लागते. यात संबंधितांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं ईडीसारखा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, असं भुजबळ म्हणाले.