ED: आमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ, बीडमधील पोल्ट्री ईडीकडून जप्त

आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे.

ED: आमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ, बीडमधील पोल्ट्री ईडीकडून जप्त
Ratnakar Gutte
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 8:07 AM

बीड/परभणी: आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. ईडीं यापूर्वी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केली आहे. आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

रत्नाकर गुट्टे ईडीच्या चौकशीला अनुपस्थित

शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गेल्या आठवड्यात गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिल ची सुमारे 100 एकर जमीन जप्त ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता परळी – अंबेजोगाई रोडवरील वरवई गावातील ही पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशी साठी बोलावलं होतं. मात्र ,त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहिले नाहीत.

255 कोटी रुपयांची मालमत्ता अगोदरच जप्त

रत्नाकर गुट्टे हे रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. त्यापैकी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. त्यानंतर आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

प्रक्रियेनुसार मालमत्ता जप्त

मालमत्ता जप्त करण्याची ईडीची एक प्रक्रिया असते. आधी ईडी तपास करते. हा तपास दोन पातळ्यांवर असतो. एक म्हणजे मनी लाँडरिंगची रक्कम शोधणे आणि दुसरं म्हणजे त्या रकमेची मालमत्ता जप्त करणे. या ईडीने प्रक्रियेनुसार मालमत्ता जप्त केली. त्यानंतर त्याची माहिती कोर्टाला दिली. PMLA कायद्यानुसार एखाद्या आरोपीची मालमत्ता जप्त केल्या नंतर त्याची माहिती कोर्टाला द्यावी लागते. त्यानंतर कोर्ट त्यावर शिक्कामोर्तब करत. त्यानंतर ईडी मालमत्ता आपल्या ताब्यात घेत असते. आमदार गुट्टे यांच्या मालमत्ते बाबत ही प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आल्या आहेत.

रत्नाकर गुट्टे यांना कोरोना संसर्ग

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येण्यापूर्वी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

इतर बातम्या:

Mahesh Shinde : जनतेचा विचार करुन शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, शिवसेना आमदाराचं वक्तव्य

माझी बायको विडी ओढते, मला घटस्फोट मिळवून द्या, नवरा थेट पोलिसात; बायकोने सांगितलं चक्रावणारं कारण

ED seized Ratnakar Gutte owned Poultry in Money Laundering Case

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.