चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी, शहर पुन्हा उभं करण्यासाठी 5 अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती: एकनाथ शिंदे

शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी, शहर पुन्हा उभं करण्यासाठी 5 अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती: एकनाथ शिंदे
EKNATH SHINDE
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 8:04 PM

रत्नागिरी, चिपळूण : शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. (Eknath Shinde announces 2 crore rupees for cleaning of Chiplun Maharashtra city appointed 5 officers)

शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य, 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांच या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे.

बोटी, लाईफ जॅकेट्स खरेदी करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं.चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकार्याकडे केली.

शिवसेनेकडून टू व्हीलर दुरुस्तीचा अभिनव उपक्रम

चिपळूण शहरात पुराचे पाणी घुसल्याने या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली तर काही दुचाकी चिखलात माखल्याने नादुरुस्त झाल्या. आशा दुचाकी विनामूल्य दुरुस्त करून देण्याचा उपक्रम शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आला आहे. स्थानिक शिवसेना उपविभागप्रमुख बालाजी कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे यांनी यासाठी लागणारे सारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. आज नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी या उपक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली. आजच्या दिवसात 15 दुचाकी दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या :

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटी जाहीर, केंद्र सरकारची घोषणा

6 जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान, कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज : विजय वडेट्टीवार

अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीचा सक्रीय सहभाग नाही, तर राज कुंद्राची तळोजा जेलमध्ये रवानगी, कोर्टात काय-काय घडलं?

(Eknath Shinde announces 2 crore rupees for cleaning of Chiplun Maharashtra city appointed 5 officers)

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.