परिवहन खात्यातील भ्रष्टाचाराची पहिली तक्रार, अनिल परब यांच्या चौकशीवर गजेंद्र पाटलांची पहिली प्रतिक्रिया

परिवहन विभागात कार्यरत डेपोटी आरटीओ दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी आणि काही ठिकाणी ईडीने छापे घातल्यानं महाराष्ट्रभरात खळबळ उडाली. परिवहन खात्यात सुरू असलेल्या या भ्रष्ट्राचारा विरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होते. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं. याचविषयीचा हा खास रिपोर्ट.

परिवहन खात्यातील भ्रष्टाचाराची पहिली तक्रार, अनिल परब यांच्या चौकशीवर गजेंद्र पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 1:56 PM

मोतिलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : परिवहन विभागात कार्यरत डेपोटी आरटीओ दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी आणि काही ठिकाणी ईडीने छापे घातल्यानं महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही चौकशी होणार आहे. परिवहन खात्यात सुरू असलेल्या या भ्रष्ट्राचारा विरोधात पहिली तक्रार गजेंद्र पाटील यांनी केली होते. त्यात खरमाटे यांचं देखील नाव होतं. याचविषयीचा हा खास रिपोर्ट.

काय होती तक्रार ?

गजेंद्र पाटील यांनी मे महिन्यामध्ये परिवहन विभागात सुरू असलेल्या बदल्यांमधील कारभार आणि त्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली. न्यायालयात याचिकाही दाखल केली. त्याची सुनावणी अद्यापही सुरू आहे. नाशिक पोलीस आयुक्तांच्या एसआयटीने 80 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यात बजरंग खरमाटेही होते.

नाशिक पोलीस आयुक्त यांनी साडेपाच हजार पानांचा अहवाल पोलीस महासंचालक यांना पाठवला. मात्र, कुठलीही कारवाई झाली नाही. आता ईडीकडून कारवाई सुरू झालीय. पोलीस महासंचालकांनी कारवाई केली नाही म्हणून पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याची नाराजी तक्रारदार व्यक्त करतात.

“बजरंग खरमाटे परिवहन विभागाचे सचिन वाझे”

आरोपी बजरंग खरमाटे यांना परिवहन विभागाचे सचिन वाझे म्हटलं जातंय. या प्रकरणी अनिल परब यांना अटक होण्याबाबत बोलताना गजेंद्र पाटील म्हणाले, “बजरंग खरमाटे यांना समाज माध्यमांनी सचिन वाझे नाव दिलं. मी केलेल्या तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेऊन चौकशी केली. परिवहन विभागातील बदल्यांचा भ्रष्टाचार, एक डेपोटी दर्जाचा अधिकारी महाराष्ट्रभर बदल्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतो. त्याला राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संरक्षणाशिवाय पाठिंब्या शिवाय हे काही शक्य नाही.”

कोण आहेत बजरंग खरमाटे?

बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

अनिल परब यांना ED ची नोटीस

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरलेत, चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; परब यांनी मागितली ईडीकडे 14 दिवसांची मुदत

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी

अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?

व्हिडीओ पाहा :

First complainant Gajendra Patil in MSRT corruption issue react on Anil Parab

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.