Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Kolhapur Rain)

Maharashtra Rains : राधानगरीचे दरवाजे उघडणार, कोल्हापूरला पुन्हा पुराचा फटका बसणार?; नेव्ही, आर्मी सज्ज
Kolhapur Rain
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:59 AM

कोल्हापूर: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरपरिस्थितून नागरिकांची सुटका करण्यासाठी नेव्ही आणि आर्मीलाही सज्ज करण्यात आलं आहे. (flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरासरी 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्रीपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटावर जाण्याचा अंदाज आहे. दुर्देवाने जिल्ह्यात 2019 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच गरज भासल्यास एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात मागवण्यात येणार आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.

प्रवाशांना 24 तास थांबावं लागणार

आज संध्याकाळपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. याचा फटका काही प्रमाणात बसणार आहे. भयावह पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू आहे. अलमट्टी धरणातून नियोजनबद्ध पाणी सोडलं जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-बंगलोर महामार्गावरील कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या महामार्गावरील एकच लाईन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसामुळे अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासन मदत करेल. किमान 24 तास प्रवाशांना थांबावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

हॉस्पिटलमध्ये अडकून पडलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना शहरातील इतर हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सध्या नेव्ही आणि आर्मी यांना होल्डवर ठेवला आहे. गरज वाटल्यास त्यांना ही बोलावू. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. आवश्यक ती मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

संबंधित बातम्या:

Maharashtra Rains : कोल्हापुरात दसरा चौकापर्यंत पाणी, सांगलीत कृष्णेचं विक्राळ रुप, साताऱ्यात 7-8 घरं ढिगाऱ्याखाली

Mumbai Rains: गोवंडीत घर कोसळून 3 ठार, 7 जखमी; ढिगारा उपसण्याचे काम सुरू

Konkan Rains: कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू; रावसाहेब दानवे घेणार आढावा

(flood in kolhapur: keep the emergency system ready, instructions given by Satej Patil)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.