पर्यटनस्थळावर वाढती गर्दी, सेल्फी काढताना महिलेचा पाय घसरून कोसळली नदीत

डहाणूतील एक दाम्पत्य हे वाघाडीतील भीम बांध येथे पर्यटनासाठी आले होते. मात्र महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला. ती महिला थेट दगडावरून नदीत कोसळली.

पर्यटनस्थळावर वाढती गर्दी, सेल्फी काढताना महिलेचा पाय घसरून कोसळली नदीत
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 5:48 PM

पालघर : सध्या पावसाळ्याच्या काळात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हाच सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. आज डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही असाच प्रकार घडला. सुदैवाने येथे असलेल्या डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारली. नदीच्या प्रवाहात पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुर्या नदीला मोठा पूर आला.

डहाणूतील एक दाम्पत्य हे वाघाडीतील भीम बांध येथे पर्यटनासाठी आले होते. मात्र महिला सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला. ती महिला थेट दगडावरून नदीत कोसळली. यानंतर पिंटू गहला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीत उड्या टाकत या महिलेला सुखरूप बाहेर काढलं.

तरुणांची कसून चौकशी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांवरदेखील पर्यटकांची गर्दी वाढली. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जात आहे. त्र्यंबकेश्वरमधील पहिने फाटा याठिकाणी पोलीस तरुण पर्यटकांची तपासणी करतात. तरुणांनी मद्य पिऊन पर्यटन स्थळावर धिंगाणा करू नये. याची खबरदारी म्हणून पोलीस ही तपासणी करत आहेत. ब्रिथ analyser च्या सहाय्याने तरुणांची कसून तपासणी केली जात आहे. यात दोषी आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय.

पर्यटकांचा हिरमोड

शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मुंबई-नाशिकच्या हौशी पर्यटकांनी शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या निसर्गरम्य अशा अशोका धबधब्यावर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या मनाई हुकुमामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. काही पर्यटक आडमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करत होते. सुटी कशी मजेत गेली पाहिजे. असे बहुतेकांना वाटते. त्यामुळे ते पर्यटन स्थळांचा वापर करतात. पण, काही दुर्घटना घडत असल्याने प्रशासन सज्ज राहते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.