सांगलीत फॉर्म हाऊसवर तब्बल 19 जिवंत नाग, मडकी, पोती, पिशव्यांमध्ये बंदीस्त करण्याचा हेतू काय?
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे एका फार्महाऊसवर तब्बल 19 जिवंत नाग सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. हे नाग फार्महाऊसवर मडकी, पोती आणि पिशवीमध्ये बंदिस्त करून ठेवलेले होते.
सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे एका फार्महाऊसवर तब्बल 19 जिवंत नाग सापडले आहेत. शिराळ्याच्या वन विभागाने ही कारवाई केली आहे. हे नाग फार्महाऊसवर मडकी, पोती आणि पिशवीमध्ये बंदिस्त करून ठेवलेले होते. वन विभागाने कारवाई करून हे नाग जप्त केले आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. याबाबत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाला निनावी दूरध्वनी फोन आला आणि फार्म हाऊसमध्ये नाग बंदिस्त करून ठेवले असल्याची माहिती मिळाली. या बंदिस्त नागांचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यामुळे ही माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मडकी, पोती, पिशवी ठेवलेल्या दिसल्या. यात 19 नाग आढळून आले.
नागाची वैद्यकीय तपासणी करणयात आली आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रकरणी वन विभागाने अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत शिराळा येथे मोठ्या प्रमाणात नाग सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
जिवंत नागपूजा रोखण्यासाठी बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीवर वनविभागाकडून यंदा ‘ड्रोन’ची नजर
Video | हिंसक पक्षी चाल करुन आला, सापाने जबड्यात पकडताच फडफडायला लागला, थरारक युद्धाचा व्हिडीओ व्हायरल
VIDEO | बाईकच्या समोरच्या भागात घुसलेल्या नागाची थरारक सुटका
व्हिडीओ पाहा :
Forest department found 19 snakes in farm house of Shirala Sangli