राज्यात चार आगीच्या घटना, कुठे ट्रक पेटला, तर कुठे दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी
अहमदनगरातील भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या नेहरु मार्केटला भीषण आग लागली होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत 24 पैकी 20 दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीत छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे तातडीने घटनास्थळी हजर झाले.
मुंबई : राज्यात आज चार आगीच्या घटना घडल्या आहेत. कुठे ट्रकला आग लागलीये, तर कुठे उभ्या कारने पेट घेतला आहे. राज्यातील अहमदनगर, चंद्रपूर, येवला, औरंगाबाद येथे या आगीच्या घटना घडल्या आहेत.
अहमदनगरातील नेहरु मार्केटला भीषण आग
अहमदनगरातील भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या नेहरु मार्केटला भीषण आग लागली होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत 24 पैकी 20 दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीत छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे तातडीने घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून घेतल्या, मात्र 24 पैकी 20 दुकाने आगीत जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत.
चंद्रपुरात पार्क केलेल्या कारने पेट घेतला
चंद्रपुरात नागपूर महामार्गावरील हॉटेल ट्रायस्टार चौकात चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 24 तास वर्दळ असणाऱ्या या महामार्गावर ट्रायस्टार चौकात इग्निस कार पार्क केलेली होती. मात्र काही वेळातच त्या कारने अचानक पेट घेतला. नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबद्दल सूचना दिली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले. ही कार कुणाची याबद्दल अज्ञाप काही माहिती मिळालेली नाही.
येवल्यात कापड दुकानाला आग
येवला शहरातील शिंपी गल्ली भागातील अशोक गुजराथी यांच्या कापड दुकानात आग लागली. स्थानिकांनी बघताच अग्निशामक दलाला फोन करुन पाचारण करण्यात आलं. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली. तरी या आगीमध्ये कापड दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. त्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून आग बघण्यास एकच गर्दी झाली होती.
औरंगाबादेत गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर एका ट्रकला भीषण आग लागली. ट्रक रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जाळून खाक झाला. गंगापूर रोडवरील विराज होटेल जवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
संबंधित बातम्या :
औरंगाबादच्या गंगापूररोडवर ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली