प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर पायात रॉड बसवले, वर्ध्यात नेमके कसे उपचार केले?

वर्ध्यात पायाचं हाड फ्रॅक्चर असलेल्या काळविटाचं पिल्लू आणि हाताचं हाड फ्रॅक्चर असलेल्या वानरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून दोन्ही प्राण्यांची मोडलेली हाडे जोडण्यात यश आलं आहे.

प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर पायात रॉड बसवले, वर्ध्यात नेमके कसे उपचार केले?
प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:13 AM

वर्धा : अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी वन्यप्राण्यांचीही हाडे फ्रॅक्चर होतात. मानवाचा अवयव फ्रॅक्चर झाल्यास शस्त्रक्रिया होतात. पण, वन्यप्राण्यांत मात्र अशा शस्त्रक्रिया अपवादानेच पाहायला मिळतात. वर्ध्यात पायाचं हाड फ्रॅक्चर असलेल्या काळविटाचं पिल्लू आणि हाताचं हाड फ्रॅक्चर असलेल्या वानरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून दोन्ही प्राण्यांची मोडलेली हाडे जोडण्यात यश आलं आहे. (Fracture Treatment operation on monkey and Blackbuck at wardha)

काळविटाच्या पिल्लाला सध्या प्लास्टर गुंडाळलं आहे. काही दिवसांपूर्वी वनविभागानं या पिल्लाला पिपल फॉर अ‍ॅनिमल्सकडं आणलं. व्यवस्थित चालता येत नसलेल्या पिल्लाच्या पायाचा एक्स रे काढला असता पाय फ्रॅक्चर असल्याचं दिसलं. डॉक्टरांनी पिल्लावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. काळविटाच्या पिलाच्या पायात चार रॉड टाकले आहेत. या शस्त्रक्रियेसाठी तीन तासांचा अवधी लागला. सोबतच वानराच्या पुढच्या हाताचं हाड फ्रॅक्चर असल्याचं दिसलं. वानराच्याही हातात रॉड टाकण्यात आला आहे.

fracture monkey

fracture monkey

सुरुवातीला आणलेल्या दोन्ही प्राण्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. त्याकरिता करुणाश्रमात आल्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार केले. सध्या दोन्ही प्राण्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. शस्त्रक्रियेनंतर हाड जुळलं असून दीड महिन्यानंतर रॉड काढले जाणारे आहेत.

fracture treatment

fracture treatment

दोन्हीही प्राणी उड्या मारणारे आहेत. त्यामुळं शस्त्रक्रिया आणि त्याची यशस्वीता तेवढीच जिकरीची. पण, डॉक्टरांनी हे आव्हान पेललं आणि दोन्ही प्राण्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. असेच प्रयत्न प्राण्यांबाबत कायम ठेवल्यास त्यांना नक्कीच वेळीच उपचारास मदत होईल.

संबंधित बातम्या  

ऐकावं ते नवल, हत्येच्या खटल्यात कोंबडा पोलीस कोठडीत, कोर्टासमोरही हजर करणार

गाय म्हैस विकायचीय, विकत घ्यायचीय, मग ही वेबसाईट आहे ना! शेतकऱ्यांनो ट्राय करा!

सिद्धार्थ उद्यानात 16 वाघांसह 320 प्रकारचे प्राणी, कोरोनाकाळात अशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी, वाचा…

(Fracture Treatment operation on monkey and Blackbuck at wardha)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.