Gram Panchayat Election 2022 Voting Live : गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

| Updated on: Dec 18, 2022 | 11:51 PM

Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात

Gram Panchayat Election 2022 Voting Live : गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: आज रविवार 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणरा आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून आज अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी ग्रामीण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या ग्रामपंचायती मतदार राजा कुणाच्या हाती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Dec 2022 09:33 PM (IST)

    इंदापूर : लग्नानंतर नवरदेवानं गाठलं मतदान केंद्र

    इंदापूर : लग्नानंतर नवरदेवानं गाठलं मतदान केंद्र

    मतदानासाठी न जेवताचं लग्नातून परतला नवरदेव

    ९० किलोमीटर अंतर गाठून आधी केलं मतदान

    कुरवली येथील अक्षय चांगदेव चव्हाणनं केलं मतदान

    पंढरपुरातून गाठली ९० किमीवरील इंदापुरातील करवली

  • 18 Dec 2022 08:33 PM (IST)

    उस्मानाबादमध्ये मतपेट्या महसूल भवन येथे कडक पोलीस बंदोबस्तात जमा

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार,

    तहसील कार्यालयातील महसूल भवन येथे कडक सुरक्षेत EVM मतपेट्या जमा करण्यात आल्या,

    पोस्टल मतदान व इतर कागदपत्रे सीलबंद लिफाफ्यात जमा करण्यात आल्या,

    मतदान केंद्रातून वाहनाने या मतपेट्या एकत्र जमा करण्यात आल्या

  • 18 Dec 2022 08:05 PM (IST)

    बारामती

    ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानासाठी दाम्पत्य थेट दुबईहून गडदरवाडीला

    80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामतीत दाखल झाले दाम्पत्य

  • 18 Dec 2022 08:04 PM (IST)

    कल्याण

    कल्याण तालुक्यातील ८ ग्रामपंचायत ८६.६२टक्के मतदान

    कल्याण ग्रामीण भागातील ९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी २६ तर सदस्य पदासाठी १०९ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

    गेरसे,वेहळे, कुंदे, पळसोली, वसतशेलवली, कोसले, नादंप, काकडपाडा, वासुंद्री या गावात सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूका होत आहे

    यापैकी काकडपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आज ८ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली

    यात सरासरी ८६.६२टक्के मतदान झाले असून एकुण ७, १५० मतदारापैकी, एकुण ६,१०६ मतदारांनी मतदानाचा हक्क ८ ग्रामपंचायती मध्ये मतदारांनी बजावला

    मगंळवारी सकाळी ९.०० वा.या ग्रामपंचायची मतमोजणी प्रक्रिया होणार कल्याणच्या पंचायत समिती हाँल मध्ये मतमोजणी होणार

  • 18 Dec 2022 06:12 PM (IST)

    हातकणंगले तालुक्यात अजून काही गावांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू

    इचलकरंजी :

    हातकणंगले तालुक्यात अजून काही गावांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू

    तारदाळ गावामध्ये अजून 200 मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत

    मतदान बूथच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    मतदानाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या खबरदारी

  • 18 Dec 2022 06:03 PM (IST)

    सांगली : नवऱ्या मुलीची गाडी थेट मतदान केंद्रावर

    सांगली : नवऱ्या मुलीची गाडी थेट मतदान केंद्रावर

    विटाच्या भाळवणी येथील अंजली जनार्दन शिंदेनं केलं मतदान

    नवरोबानं डोक्याला बाशिंग बांधून बजावला मतदानाचा अधिकार

    उमदी येथील विठ्ठल नगर येथील सुनील सातपुते यांनीही केलं मतदान

  • 18 Dec 2022 05:36 PM (IST)

    बेळगावमधील महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांचा दबाव कायम

    कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 19 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन

    महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रणही दिले; पण या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये, यासाठी कर्नाटक पोलिसांकडून प्रयत्न

    19 डिसेंबर रोजी होणार्‍या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना आणणार नाही, हे लेखी देण्याची सूचना

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात समन्वय राखून खबरदारी घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली

    बेळगावच्या पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर दबाव आणण्याचे काम सुरू

  • 18 Dec 2022 05:27 PM (IST)

    खानापूर तालुक्यातील करंजेमध्ये मतदारांनी मतदान केंद्रासमोरच मारली बैठक

    खानापूर तालुक्यातील करंजे मध्ये मतदारांनी मतदान केंद्रासमोरच मांडली बैठक

    मतदान गतीने होत नसल्याने मतदारांनी कंटाळून मतदान केंद्रासमोर मांडली बैठक

    करंजे गावामधील प्रभाग क्र. 4 च्या बूथ केंद्रावरची परिस्थिती

    मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रकियेला सकाळपासून होतोय उशीर

  • 18 Dec 2022 05:09 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीतील टक्केवारी

    नाशिक जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत संख्या – 188

    मतदान केंद्र संख्या – 745

    स्त्री मतदार – 198551 पुरुष मतदार – 220272 इतर मतदार – 1 एकूण मतदार – 418824

    सकाळी 7.30 ते 03.30 या वेळेत झालेले मतदान स्त्री – 136714 पुरुष – 150648 एकूण – 287362 टक्केवारी – 68.61%

  • 18 Dec 2022 05:00 PM (IST)

    गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील हेलिकॅप्टर परतले

    नक्षलग्रस्त भागातील मतदान पथके मतदान संपवून हेलिकॉप्टरनी परत

    दहा तालुक्यात 27 ग्रामपंचायतीची निवडणूक आज पार पाडली

    यापैकी 21 ग्रामपंचायती नक्षलग्रस्त व अति संवेदनशील भागात होत्या

    मतदान पथके हेलिकॉप्टरने दोन दिवसांअगोदर पाठविण्यात आली होती

    साडेचार वाजेपासून मतदान पथकांना हेलिकॉप्टरने परत आणण्याचे काम सुरू

  • 18 Dec 2022 04:51 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    पालघर जिल्ह्यात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    सकाळी साडे सात ते दीड वाजेपर्यंत 54.73 टक्के एवढे मतदान

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी उरले अवघे काही मिनीट…

  • 18 Dec 2022 04:38 PM (IST)

    गडचिरोली: 27 ग्रामपंचायतीच्या मतदानाची टक्केवारी 70.11%

    गडचिरोली जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतीचे मतदानाची दीड वाजेपर्यंत ची टक्केवारी 70.11%

    गडचिरोली जिल्हा अति संवेदनशील नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे फायनल मतदानाची टक्केवारी अघाप प्राप्त नाही

    गडचिरोली जिल्ह्यातील मतदान संपले

    नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे साडेसात वाजेपासून तीन वाजेपर्यंत होती मतदानाची वेळ

  • 18 Dec 2022 04:35 PM (IST)

    पालघरच्या वाडा तालुक्यातील 14 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय

    पालघरच्या वाडा तालुक्यातील 14 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय

    13 सरपंच पदासाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत

    तर सदस्य पदाच्या 199 जागांसाठी 319 उमेदवार रिंगणात आहेत 42 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली जात आहे

    दुपारी चार वाजता वाडा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतचे 77.97 टक्के मतदान झालं

  • 18 Dec 2022 03:46 PM (IST)

    ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात साप शिरला

    ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात शिरला साप

    त्यामुळे एकच तारांबळ उडाली

    सर्प मित्रांनी रेस्क्यू करत या सापाला जीवदान दिले

  • 18 Dec 2022 02:44 PM (IST)

    उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उद्या नागपूरात जाणार

    महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या चार वाजता बैठक. उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उद्या नागपूरात जाणार.

  • 18 Dec 2022 02:39 PM (IST)

    अमलीपदार्थ विरोधी शाखेची कारवाई

    मुंबई पोलीस दलातील वरळी युनिटच्या अमलीपदार्थ विरोधी शाखेने नायजेरियन ड्रग पेडलरला माझगाव येथून अटक केली. त्याच्याकडून एमडी आणि अन्य ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 35.30 लाख रुपये आहे. एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

  • 18 Dec 2022 01:21 PM (IST)

    भंडाऱ्यात मतदान प्रक्रिये दरम्यान दोन गटात हाणामारी

    एका विशिष्ट गटाला मतदान केंद्र परिसराच्या आतमध्ये तर दुसऱ्या गटाचा उमेदवाराला बाहेर ठेवल्यामुळे झाला वाद

    काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं मूळ गांव असलेल्या सुकळी येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली या गावात दोन गटामध्ये तुफान हाणामारी

  • 18 Dec 2022 12:59 PM (IST)

    करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड

    करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड

    मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ गोंधळ

    मतदान केंद्रांवर लांबच लांब मतदारांच्या रांगा

    मतदान यंत्रात बिघाड झाल्याने अनेक जण मतदानासाठी खोळंबले

    तब्बल तासभरापसून मशीन बंद पडल्याने मतदार ताटकळले

  • 18 Dec 2022 12:56 PM (IST)

    मावळ तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी मतदान

    मावळ तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी सकाळी 11:30 पर्यंत 32.46 टक्के मतदान

    2176 महिला तर 2555 पुरुष अशा एकूण 4731 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

  • 18 Dec 2022 12:44 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायत पैकी 345 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात

    गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायत पैकी 345 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात

    तर ३ ग्रामपंचायत बिनविरोध

    दोन ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध, सदस्यांचा मतदान सुरु

    पिपरखारी ग्रामपंचायत क्षेत्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त

    काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप आणि चाबी यांच्यात सरळ लढतीची शक्यता

  • 18 Dec 2022 12:35 PM (IST)

    गडचिरोलीत स्वतंत्र्याआधी जन्मलेल्या 90 वर्षीय दोन आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

    गडचिरोली जिल्ह्यात 27 ग्रामपंचायतींची मतदानाची टक्केवारी साडे अकरा वाजेपर्यंत 47.94%

    गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    अति संवेदनशील दुर्गम भागातही मतदारांमध्ये मोठा उत्साह

    स्वतंत्र्या आधी जन्मलेल्या दोन आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला

  • 18 Dec 2022 12:33 PM (IST)

    बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार

    मेंगडेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

    मतदान केंद्र दुसऱ्या गावात हलविल्याने ग्रामस्थ संतप्त, 845 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

    सहा किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र असल्याने ग्रामस्थ नाराज

    अचानक मतदान केंद्र बदलल्याने ग्रामस्थ आक्रमक, निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

    गावातच ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरू

    मतदान केंद्र गावात द्या, तरच मतदान करणार, संतप्त ग्रामस्थांचा पवित्रा

  • 18 Dec 2022 11:44 AM (IST)

    आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कुटुंबासह ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बजावला मतदानाचा हक्क

    अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावी जाऊन बजावला मतदानाचा हक्क

    बच्चू कडू यांचे मोठे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात

  • 18 Dec 2022 11:42 AM (IST)

    भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

    जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या लोणी या गावी त्यांनी केले मतदान

    राज्यातील साडे तीन हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप युवा मोर्चाचे 100 ते 200 सरपंच विजयी होतील

    राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला विश्वास आहे

  • 18 Dec 2022 11:40 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात पहिल्या 2 तासात 14.21 टक्के मतदान

    राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान

    पालघर जिल्ह्यात पहिल्या 2 तासात 14.21 टक्के मतदान

    सकाळच्या वेळेत मतदारांचा अल्प प्रतिसाद

  • 18 Dec 2022 11:38 AM (IST)

    कोल्हापुरात बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव वरातीने मतदानासाठी

    हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे विष्णू देशमुख घोड्यावरून मतदानासाठी

    धैर्यशील माने यांच्यासह नवरदेव वरात घेऊन जातोय मतदान केंद्रावर

  • 18 Dec 2022 11:08 AM (IST)

    बुलढाण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग

    मतदारांना दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांवर थेट उमेदवारांचे नाव आणि चिन्हाचा उल्लेख

    मतदान केंद्र परिसरात या चिठ्ठ्या पोहोचल्या

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गंभीर प्रकार

  • 18 Dec 2022 11:06 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब ग्रामपंचायतीच्या मतदानादरम्यान बंद पडलेले इव्हीएम मशीन पुन्हा सुरू

    सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर एकाच केंद्रावरील इव्हीएम मशीन दोनदा बिघडली होती

    मात्र काही वेळानंतर बंद पडलेल्या मशिन्स सुरु झाल्या.

    ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मूळ गावातील इव्हिएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी बंद पडली होती

  • 18 Dec 2022 09:25 AM (IST)

    बीडमध्ये केजच्या साळेगाव मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन बंद पडली

    मशीन बंद पडल्याने काही वेळ तणाव

    मतदान केंद्र 57/1 वरील मशीन बंद, तहसीलदार घटनास्थळी दाखल

  • 18 Dec 2022 09:24 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब ग्रामपंचायतीच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन बंद पडली

    सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात, मात्र एकाच केंद्रावरील इव्हीएम मशीन दोनदा बिघडली

    ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मूळ गावातील इव्हिएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी बंद

    भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला

    सोपल गटातर्फे सरपंचपदासाठी भानुदास बोधले तर राऊत गटातर्फे भानुदास बोधले यांचेच चुलत नातू रमेश बोधले निवडणुकीच्या रिंगणात

  • 18 Dec 2022 09:23 AM (IST)

    भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

    आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

    या गावात पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदाच्या उमेदवार आहेत

  • 18 Dec 2022 09:21 AM (IST)

    उमेदवारांचा माथा मतदारा राजांच्या चरणांवर

    मालेगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दाभाडी ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर चक्क उमेदवार मतदारांचे पाया पडत आहेत

    मतदान करतेवेळी मतदारांचा पाया पडून मतदारांना साकडे घातले जात आहे

    याच ग्रामपंचयतीत पालकमंत्री भुसे आणि माजी मंत्री प्रशांत हिरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

  • 18 Dec 2022 07:42 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात 345 ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरूवात

    तर 3 ग्रामपंचायत बिनविरोध

    सकाळी सकाळी लोकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद

    काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि चाबी यांच्यात सरळ लढत

  • 18 Dec 2022 07:07 AM (IST)

    नगरमधील 203 ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक तर 15 ग्रामपंचायत बिनविरोध

    थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार

    श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी प्रतिष्ठेची

    पाचपुते यांचा पुत्र प्रतापसिंह पाचपुते आणि पुतण्या साजन पाचपुते एकमेकांच्या विरोधात

  • 18 Dec 2022 07:06 AM (IST)

    आज अमरावती जिल्ह्यातील 252 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान

    प्रहारचे आमदार बच्चू, आमदार राजकुमार पटेल यांची प्रतिष्ठापणाला

    बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत बच्चू कडू यांचे मोठे भाऊ भैय्या कडू सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात

    आमदार देवेंद्र भुयार यांच्याही गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत

    257 पैकी 5 ग्रामपंचायत अविरोध

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 लाख 51 हजार 368 मतदार करणार निवडणूकित मतदान

  • 18 Dec 2022 06:28 AM (IST)

    सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीत भाजपला शत-प्रतिशत यश मिळेल असा दावा भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी केलाय

    यावेळी राजन तेली यांनी कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नांदगाव येथे केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला

    तेली म्हणाले की, वैभव नाईक हे ‘एक्सिडेंटली’ झालेले आमदार असून त्यांनी आपल्या मालवणमध्ये आधी लक्ष द्यावे

  • 18 Dec 2022 06:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील मावळात आठ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय

    लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी काल रूट मार्च केला

    वडगांव मावळसह लोणावळा ग्रामीण आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक गावात पोलिसांचा रूट मार्च झाला

  • 18 Dec 2022 06:20 AM (IST)

    सांगलीच्या नरवाड गावात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचा छापा

    मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या आणि पाचशे रुपयांच्या दोन नोटा जप्त

    कोणत्या उमेदवारांनी साड्या आणि वस्तू आणल्या याचा तपास सुरू

    भरारी पथक गावात यायच्या अगोदर चौकात साड्या आणि पैसे टाकले

  • 18 Dec 2022 06:18 AM (IST)

    नंदुरबारमधल्या 08 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची वेळ ही फक्त दुपारी 3.30 वाजेपर्यंत असणार

    अक्कलकुवा तालुक्यातीसल 04 आणि अक्राणी तालुक्यात 04 ग्रामपंचायतींचा यात समावेश

    या 08 ही ग्रामपंचायती अतिदुर्गम भागात वसलेल्या असल्याने याठिकाणी पोहचण्यासाठी मतदान यंत्रणेला अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

    त्यामुळे परतताना रात्रीच्या अंधारात काही अघटीत घडू नये म्हणून या ग्रामपंचायतींच्या मतदानाची वेळ फक्त साडेतीन वाजेपर्यत असणार आहे

    अक्कलकुवा तालुक्यातील मणीबेली, डनेल, जांगठी, धनखेडी तर अक्राणी तालुक्यातील उडद्या, भादरी, भादल, भमाणे अशा ग्रामपंचायती आहेत.

  • 18 Dec 2022 06:09 AM (IST)

    पालघर जिल्ह्यातील पालघरमधील नवजई ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे

    पालघर जिल्ह्यात एकूण 63 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत

    त्यातील एक नवजाई ही ग्रामपंचायत बिनवीरोध निघाल्याने 62 ग्रामपंचायतसाठी निवडणुका होत आहेत

    यात 62 सरपंचासह 443 सदस्य असे 505 सदस्य आणि सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे

    या निवडणुकीसाठी 1254 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात उभे आहेत.

    पालघर जिल्ह्यात एक नवजाई ही ग्रामपंचायीसह 101 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत

    तर एकही उमेदावारांचा अर्ज न आल्याने 16 सदस्य पदासाठी निवडणूक होणार नाही

Published On - Dec 18,2022 6:04 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.