Gadchiroli Flood : विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, गडचिरोलीत पुराची स्थिती कायम, अनेक गावे पाण्यात बुडाली

गडचिरोली जिल्ह्यात महापुराने जवळपास 47 गावातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं. सिरोंचा आणि अहेरी या दोन तालुक्यात मोठे नुकसान झाले.

Gadchiroli Flood : विदर्भात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, गडचिरोलीत पुराची स्थिती कायम, अनेक गावे पाण्यात बुडाली
गडचिरोलीत पुराची स्थिती कायमImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:50 PM

गडचिरोली : नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात आजपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरवत नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाली. नुकत्याच आलेल्या महापुराच्या संकटातून विदर्भाची जनता बाहेर पडत आहेत. पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने नदीशेजारच्या नागरिकांमध्ये भीती आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय. गडचिरोली शहरात (Gadchiroli City) या मुसळधार पावसाने अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना (Citizens) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहराच्या बाह्य भागातील अनेक वसाहती पाण्यात बुडाल्याने नागरिकांना कामावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय.

खबरदारी बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

गेले दहा दिवस गडचिरोली शहर जिल्ह्यात प्रचंड पावसाने पुराची स्थिती होती. दक्षिण गडचिरोलीत केले दहा दिवस पुराने हाहाकार माजविला. शेती- घरे- सार्वजनिक मूलभूत सोयीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात जिल्हा पूर्वपदावर येत असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. एक जूनपासून आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 169 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासात गडचिरोलीसह विदर्भाच्या प्रमुख जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पूरग्रस्तांची स्थलांतरणाची मागणी

गडचिरोली जिल्ह्यात महापुराने जवळपास 47 गावातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं. सिरोंचा आणि अहेरी या दोन तालुक्यात मोठे नुकसान झाले. सिरोंचा तालुक्यात दोन दिवसांपासून नुकसान झालेल्या 40 गावांना अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम प्रत्येक गावाला भेट दिली. जीवनावश्यक वस्तू वाटप करीत आहेत. मागील दोन दिवसात सोळा गावांना राष्ट्रवादी पक्षाने मदत पुरवली. एक हात मदतीचा या नावाने राष्ट्रवादी पक्षाकडून मोठी मदत करण्यात आली. या वेळी सिरोचातील 40 गावांना पुरविण्यात येत आहे. प्रत्येक गावात पूरग्रस्त नागरिक मागणी करीत आहेत की, आमचे गाव सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.