Jalgaon Helicopter Crash | जंगलातून अचानक मोठा आवाज, नागरिकांची घटनास्थळी धाव, जळगावात हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Helicopter Crash | जंगलातून अचानक मोठा आवाज, नागरिकांची घटनास्थळी धाव, जळगावात हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना
जंगलातून अचानक मोठा आवाज आला, नागरिकांची घटनास्थळी धाव, जळगावात हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 8:10 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, तहसीलदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. पोलीस आणि प्रशासनाने स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात करत जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दुर्घटनेत एकाचा मृत्यू

या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर महिला पायलट जखमी झाली आहे. महिलेवर चोपड्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटनाग्रस्थ हेलिकॉप्टर हे एनएमआईएमएस अॅकेडमी ऑफ अॅविएशनचं आहे. दुर्घटनेत ज्या व्यक्तीने जीव गमावला ती व्यक्ती फ्लाइट इंस्ट्रक्टर होती. तर जखमी महिला ही ट्रेनी पायलट आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. मृतकाच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो, असं शिंदे म्हणाले आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे नेमकं काय म्हणाले?

एनएमआईएमएस अॅकेडमी ऑफ अॅविएशनच्या एका प्रशिक्षण विमानाच्या दुखद दुर्घटनेची बातमी ऐकून स्तब्ध झालोय. घटनास्थळी तपासयंत्रणा पाठवण्यात आली आहे. दुर्देवाने आपण फ्लाईट इंस्ट्रक्टरला गमावलं आहे. तर प्रशिक्षक महिला गंभीर जखमी आहे. मृतक फ्लाईट इंस्ट्रक्टरच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. प्रशिक्षक पायलट महिलेची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो, असं ज्योतीरादित्य म्हणाले आहेत.

हेही वाचा : ईडीचा व्हिडीओकॉनच्या मालकांना दणका, दोन ठिकाणी धाडी, ICICI Bank Loan प्रकरणी मोठी कारवाई

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.