राज्यात प्राध्यापक भरती लवकरच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उदय सामंत

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. (Higher Education Minister Uday Samant on Recruitment of professors in the Maharashtra)

राज्यात प्राध्यापक भरती लवकरच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उदय सामंत
उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 2:11 PM

गोंदिया : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तसेच तासिका प्राध्यपाकांच्या मानधनात वाढ केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. गोंदियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले. (Higher Education Minister Uday Samant on Recruitment of professors in the Maharashtra)

पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला

कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. मात्र आता तज्ज्ञ समितीने या प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता ती फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे उदय सामंत म्हणाले.

राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 

तसेच तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नाही. त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असेही उदय सामंत म्हणाले.

संभाजीराजेंना पंतप्रधानांनी भेट न देणं, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान

मराठा समाजासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार रिट पेटीशन दाखल करणार आहे. छत्रपती घराण्यातील संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वर्ष दीड वर्ष भेट न देणं हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान असल्याची टिका उदय सामंत यांनी केली.

सीईटी परीक्षा शंभर टक्के जुलै महिन्यात

त्याशिवाय जेईई आणि नीटच्या परीक्षा घेणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. ज्याप्रमाणे सीबीएसई दहावी बारावीच्या केंद्र सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत. जो केंद्राचा विभाग तो जेईई आणि नीटच्या तारखा जाहीर करेल. मात्र प्रोफेशनल कोर्सेससाठी असलेली सीईटी शंभर टक्के जुलै महिन्यात घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले. (Higher Education Minister Uday Samant on Recruitment of professors in the Maharashtra)

संबंधित बातम्या : 

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

Farmers: शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Modi Cabinet Expansion : प्रीतम मुंडेंना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते का? भाजपचं काय असू शकतं गणित? जाणून घ्या ही 5 कारणे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.