Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवाचं माथेरान, कोरोनाचं संकट टळताच पर्यटकांनी माथेरान हाऊसफूल्ल, हॉटेलमध्येही जागा नाही

कोरोनामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान (Damage) झाले. मात्र, या दोन दिवसांची गर्दी पाहून माथेरानमध्ये व्यावसायिक सुखावले आहेत. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे आणि मुंबईच्या पर्यटकांनी माथेरावर चांगलीच गर्दी केली होती. मात्र, या रेकॉर्डब्रेक गर्दीमुळे वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होता.

जीवाचं माथेरान, कोरोनाचं संकट टळताच पर्यटकांनी माथेरान हाऊसफूल्ल, हॉटेलमध्येही जागा नाही
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 9:02 AM

मुंबई : मुंबई जवळचे प्रसिद्ध हिल स्टेशन माथेरानला (Matheran) नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकंट असल्यामुळे कोणीही पर्यटन स्थळांना भेट देत नव्हते. त्यामध्येही बहुतांश पर्यटन स्थळे बंदच होती. आता राज्यामध्ये कोरोनाच्या (Corona) केसेस कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी खुली करण्यात आली येत. सलग दोन दिवस सुट्ट्या बाहेर घालवण्यासाठी जवळपास 10 हजार लोक माथेरानमध्ये दाखल झाली होती. त्यामध्येही बोहरा समाजाचे धर्मगुरू हे माथेरानमध्ये असल्यामुळे गर्दी (Crowd) अधिकच होती.

कोरोनामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान

कोरोनामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या दोन दिवसांची गर्दी पाहून माथेरानमधील व्यावसायिक सुखावले आहेत. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुणे आणि मुंबईच्या पर्यटकांनी माथेरावर चांगलीच गर्दी केली होती. मात्र, या रेकॉर्डब्रेक गर्दीमुळे वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होता. पाच मिनिटांच्या अंतरासाठी पर्यटकांना एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये थांबावे लागत होते. उन्हाचा पारा चांगलाच चढला असल्याने थंडगार माथेरानकडे येण्याकडे पर्यटकांचा कल आहे. मात्र, वाहतूक पोलिसांचे नियोजन शून्य असल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

हे सुद्धा वाचा

10 ते 15 हजार पर्यटकांनी दिली माथेरानला भेट

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 10 ते 15 हजार लोकांनी माथेरानला भेट दिली आहे. यामुळे आर्थिक उलाढाल देखील चांगली झाल्याचे बोलले जात आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राबरोबर माथेरानही लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे पर्यटनावर संपूर्णत: अवलंबून असणाऱ्या माथेरानकर नागरिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले होते. पर्यटनावर जीवन जगणारे माथेरानकर हतबल झाले होते. पर्यटन सुरु झाले आणि परत एकदा पर्यटकांची मोठी गर्दी पाहून व्यावसायिक आनंदात आहेत.

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.