वहिनींवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? टप्प्याटप्प्याने सगळं बाहेर काढणार : नारायण राणे

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे.

वहिनींवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? टप्प्याटप्प्याने सगळं बाहेर काढणार : नारायण राणे
narayan rane
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 2:59 PM

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. (i will open shiv sena’s past case, narayan rane warn)

रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना नारायण राणे यांनी हा इशारा दिला. आता जुन्या गोष्टी काढणार आहेत. काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. जया जाधवची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. माहीत आहे. आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे… मी टप्याटप्याने सर्व काढणार. सुशांतची केस संपली नाहीये. दिशा सालियनचीही संपली नाही. मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असं दमच राणेंनी भरला.

दरोडेखारासारखी अटक केली

दरोडेखोराला अटक करतात तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. त्यासाठी दोन अडीचशे पोलीस आणले. वाह काय पराक्रम आहे. उगाच दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड नाही. तुम्हाला अनुभव नाही. तुम्ही पाहिलं आम्हाला. जवळून अनुभवलं आहे. नको त्या वाटेत जाऊ नका. आज ना उद्या पूर्वी सारखा माझा आवाज खणखणीत होईल. आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

वरुण परत जाणार नाही

आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आता वरून खाली ये. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक नाही. तो नातलग आहे. आता परत आला तर परत जाणार नाही. तो वरुण येऊ देच, असा इशाराही राणेंनी दिला. (i will open shiv sena’s past case, narayan rane warn)

संबंधित बातम्या:

… तर ओबीसींची अपरिमित हानी होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा

अटक नाट्यानंतर राणेंची पहिलीच जन आशीर्वाद यात्रा, शिवसेनेवर टीका टाळली; तर्कवितर्कांना उधाण

कोणतंही सरकार कायम नसतं, नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना

(i will open shiv sena’s past case, narayan rane warn)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.