Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात, सहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या महावितरण कार्यालयात एसीबीने धाड टाकली. महावितरणचे सहायक अभियंता श्रीनु चुक्का यांना 6 हजार रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. घरगुती वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकाच्या घरी सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात महावितरण कार्यालयात एसीबी (ACB)ने धाड टाकत सहायक अभियंत्या (Engineer)ला लाच घेताना रंगेहाथ पकडले. श्रीनु चुक्का असे अटक (Arrest) करण्या आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. चक्का यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने एसीबीला तक्रार केली होती. ग्राहकाला सौर यंत्रणा किट देण्यासाठी अभियंत्याने लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचून अभियंत्याला कार्यालयात स्वतः लाच स्वीकारताना अटक केले. प्रकरणाचा अधिक तपास एसीबी करत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या महावितरण कार्यालयात एसीबीने धाड टाकली. महावितरणचे सहायक अभियंता श्रीनु चुक्का यांना 6 हजार रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. घरगुती वीज कनेक्शन असलेल्या ग्राहकाच्या घरी सोलर यंत्रणा उभारणाऱ्या कंत्राटदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. ग्राहकाला सौर यंत्रणा किट देण्यासाठी अभियंत्याने सहा हजार रुपये लाचेची डिमांड केली होती. एसीबी पथकाने कार्यालयात स्वतः लाच स्वीकारताना अभियंत्याला अटक केले.
धुळ्यात 25 हजाराची लाच मागणाऱ्या अप्पर तहसीलदारासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
शेतजमीन प्रकरणातील चौकशी अहवाल धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणाऱ्या अप्पर तहसिलदारासह त्याच्या पंटरला एसीबीने अटक केली आहे. विनायक सखाराम थविल असे अप्पर तहसिलदाराचे तर संदीप मुसळे असे त्याच्या पंटरचे नाव आहे. धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पदाचा दुरूपयोग करणाऱ्या अप्पर तहसीलदार विनायक थवीलसह त्याच्या खाजगी पंटरवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लाचखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. लाचखोर तहसीलदाराच्या गाडीसमोर नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. (In Chandrapur an MSEDCL engineer was caught red-handed by the ACB accepting a bribe)