घरासमोर अंगणात बसलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; आईच्या डोळ्यासमोर घडली धक्कादायक घटना
बिबट्या मुलाला घेऊन गेला. नागरिक गोळा झाले. वनविभागाला कळवण्यात आले. मुलाची शोधाशोध सुरू झाली. रात्री मुलाचा काही पत्ता लागला नाही.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात धक्कादायक घटना घडली. तेलंगणातून एक कुटुंबीय सावली तालुक्यात मिरची तोडण्याच्या कामासाठी आले होते. दिवसा काम केल्यानंतर संध्याकाळी घरी आहे. तिथं एका बिबट्याने हल्ला केला. यात चिमुकल्या मुलाला उचलून बिबट्या घेऊन गेला. यावेळी त्याची आई बाजूलाच उभी होती. तिने आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत बिबट्या मुलाला घेऊन गेला होता. नागरिक गोळा झाले. वनविभागाला कळवण्यात आले. मुलाची शोधाशोध सुरू झाली. रात्री मुलाचा काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी दुःखद घटना समोर आली.
आईच्या डोळ्यादेखत उचलले
बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले. सावली तालुक्यातील बोरमाळा येथील काल संध्याकाळची घटना घडली. हर्षल कारमेंगे असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
शेतात सापडला मृतदेह
आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात मृतदेह सापडला. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अंगणातून बिबट्याने मुलाला उचलून नेल्याने गावात भीतीचं वातावरण आहे.
तेलंगणातून आले कुटुंबीय
चार वर्षांचा हर्षल घरासमोर अंगणात खेळत होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलाला उचलून बिबट्या घेऊन गेला. ही बाब आईच्या लक्षात आली. ती जोराने ओरडली. तोपर्यंत बिबट्या मुलाला घेऊन पसार झाला होता. गावकरी, वनविभाग आणि पो लिसांनी रात्र मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी गावाशेजारी चिमुकल्याचा मृतदेह सापडला.
आईवडील मिरची तोडण्यासाठी आले होते
हर्षल हा आईवडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याचे आईवडिल मिरची तोडण्यासाठी तेलंगणातून सावली तालुक्यात आले होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात १९ बळी गेले आहेत. त्यामुळे वाघाच्या बंदोबस्त लावण्याची मागणी जोर धरत आहे.
हर्षलचे कुटुंबीय तेलंगणाचे पण, पोटापाण्यासाठी ते सावलीत आले होते. अचानक बिबट्या हल्ला करेल, याची कल्पना केली नव्हती. या घटनेने हर्षलचे कुटुंबीय नाउमेद झाले आहेत. आपण आलो कशासाठी आणि काय घडलं, याचा विचार करत आहेत. आपण आलोच नसतो तर…