Sangli Crime : सांगलीत दोघी मायलेकींचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू, शेताच्या कडेला लघुशंंकेसाठी गेल्या असता घडली दुर्घटना

विद्या यांना लघुशंका आल्याने त्या पाटील यांच्या शेताच्या कडेला लघुशंकेसाठी गेल्या होत्या. यावेळी शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडल्याने विद्या यांस शॉक लागला. त्यानंतर त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आई सुवर्णा हेळवार ह्या देखील धावत गेल्या. काही कळण्याच्या आतच दोघींना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Sangli Crime : सांगलीत दोघी मायलेकींचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू, शेताच्या कडेला लघुशंंकेसाठी गेल्या असता घडली दुर्घटना
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 2:18 PM

सांगली : शेताच्या कडेला लघुशंकेला गेल्या असता वीजेचा शॉक (Electric Shock) लागून दोन महिलांचा(Two Womens) जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोंबलाद येथे सोमवारी घडली आहे. सुवर्णा परसाप्पा हेळवार (50) आणि विद्या संजय हेळवार (25) या दोघी मायलेकींचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. उमदी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मयत विद्या हेळवार या विवाहित असून कराड येथील आपल्या सासरहून माहेरी जाडरबोंबलाद येथे आल्या होत्या. घटनास्थळारुन काही अंतरावरच हेळवार यांचे घर आहे. (In Sangli, both of them died on the spot due to electric shock)

डुकरांसाठी लावलेल्या बायडींग तारेचा शॉक लागून मृत्यू

जाडरबोंबलाद येथील गावाजवळ राहणारे शेतकरी आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये म्हणून शेताच्या कडेला बायडींग तारेचे कुंपण केले होते. विद्या संजय हेळवार यांच्या ही बाब लक्षात आली नाही. विद्या यांना लघुशंका आल्याने त्या पाटील यांच्या शेताच्या कडेला लघुशंकेसाठी गेल्या होत्या. यावेळी शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडल्याने विद्या यांस शॉक लागला. त्यानंतर त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आई सुवर्णा हेळवार ह्या देखील धावत गेल्या. काही कळण्याच्या आतच दोघींना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत माजी सरपंच एम आर अंकलगी यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

नाशिकमध्ये कर्मचाऱ्याच्या अंगावर गरम डांबराचा ट्रक उलटला

गरम डांबराचा ट्रक एका कर्माचाऱ्याच्या अंगावर उलटल्याची काळजाचा ठोका चुकवणारी घटना आज नाशिकमध्ये घडली आहे. या अपघातात सदर कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिकमधील एम. जी. रोड परिसरात गॅस पाईपलाईनसाठी रस्त्याच्या बाजूला खड्डे खणण्यात आले होते. हे खड्डे बुझवण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

मुंबईत कार पार्क करताना अंदाज चुकल्याने अपघात

कार पार्क करताना अंदाज चुकल्याने पोडियम पार्किंगच्या दुसऱ्या मजल्यावरुन कार पडल्याची घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली आहे. सुदैवाने कारमधील 22 वर्षीय तरुणी यातून बचावली आहे. अपेक्षा मिरानी असे या तरुणीचे नाव आहे. ही कार खाली उभ्या असलेल्या एसयुव्ही कारवर पडल्याने या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (In Sangli, both of them died on the spot due to electric shock)

इतर बातम्या

Namdev Sasane : उमरखेड नगरपरिषदेत 65 लाखांचा कचरा घोटाळा, भाजपा तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Nanded Crime : जादूटोणा आणि उपचाराच्या नावाखाली नागरिकांना लुटणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.