Udgir: उदगीर जिल्हा निर्मिती दृष्टीक्षेपात, सर्वच शासकीय कार्यालये एका छताखाली, जिल्हाधिकारी कार्यालयासाठीही राखीव जागा
उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमावर्ती असलेले शहर आहे. दिवसेंदिवस येथील शिक्षण, व्यापार आणि या शहराची भौगोलिक रचना पाहता हा जिल्हा निर्मितीसाठी योग्य आहे. त्या अनुशंगीने मध्यंतरी तशी घोषणाही झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरकरांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. म्हणूनच उत्सुकता ताणली जात आहे.

लातूर : (Udgir) उदगीर जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे गेल्या अनेक वर्षापासून असले तरी याबाबत येथील (District Admistration) प्रशासन, सर्वसामान्य नागरिक यांना उदगीर जिल्हा होणार याबाबत ठाम विश्वास आहे. एवढेच नाही तर आता जी प्रशासकी इमारत उभी राहणार आहे ती देखील जिल्ह्याच्या अनुशंगानेच होणार आहे. सर्वच (administrative office) प्रशासकीय कार्यालये ही एकाच छताखाली असणार आहेत. तर भविष्यात जिल्हा निर्मिती होणारच म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासाठी देखील जागा नियोजित करण्यात आली आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे. या भव्य इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
उदगीर अन् जिल्हा निर्मिती
उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमावर्ती असलेले शहर आहे. दिवसेंदिवस येथील शिक्षण, व्यापार आणि या शहराची भौगोलिक रचना पाहता हा जिल्हा निर्मितीसाठी योग्य आहे. त्या अनुशंगीने मध्यंतरी तशी घोषणाही झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरकरांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. म्हणूनच उत्सुकता ताणली जात आहे. आज ना उद्या जिल्हा निर्मिती होणारच म्हणून प्रशासकीय इमारत बांधताना देखील जिल्हाधिकारी कार्यालयासाठी जागा देखील नियोजित करण्यात आली आहे.
ह्या इमारती एकाच छताखाली
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आपला मतदारसंघ असलेल्या उदगीर मध्ये विकासकामांसाठी पुढाकार घेतला आहे . त्यामुळे उद्गिरमध्ये तहसील , उपजिल्हाधिकारी कार्यालय , सांस्कृतिक सभागृह , नवीन विश्रामगृह ,प्रशासकीय इमारत अशा नवीन इमारती उभ्या राहत आहेत . या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले आहे.




नागरिकांचीही सुविधा
सर्वच प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्यावर नागरिकांच्या सोईचे राहणार आहे. त्यामुळे वेळेची बचत तर होतेच पण काही अडचणी निर्माण एकाच ठिकाणी सर्वकाही असल्याने त्यावर मार्गही निघतो. शिवाय ही संकल्पना आता राज्यभर राबवली जात आहे. आतापर्यंत काही ठिकाणी शहरातील चौकातील सर्व पुतळे हे एकाच ठिकाणी ठेवले जात आहेत. त्याच प्रमाणे आता प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उभारल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.