वाशिम-गोंदियात कोरोनानंतर नवं संकट, ‘या’ आजाराच्या पहिल्या बळीने खळबळ
कोरोनानंतर आता वेगवेगळ्या आजारांचं सावट तयार व्हायला लागलंय. गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाने डोकं वर काढलंय.
नागूपर : कोरोनानंतर आता वेगवेगळ्या आजारांचं सावट तयार व्हायला लागलंय. गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाने डोकं वर काढलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गोंदियात तब्बल 193 मलेरियाचे रुग्ण व 13 डेंग्यूचे रुग्ण आढळलेत. विशेष म्हणजे गोंदियात मेरियाचा पहिला बळी गेलाय. दुसरीकडे वाशिममध्ये डेंग्यूच्या 20 रुग्णांची नोंद झालीय.
गोंदियात मलेरीयाचा पहिला बळी
गोंदिया जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असताना आता मलेरीयासह डेंग्यूने डोके वर काढले. मलेरीयाने जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहगाव येथील विनायक राऊत वय 32 याचा पहिला मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय. जिल्ह्यात कोरोनापेक्षा आता मलेरीयाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तब्बल 193 मलेरियाचे रूग्ण तर डेंग्यूचे 13 रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे.
दरम्यान आरोग्य विभागाने आता परीसरात सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. आता नागरिकांकडून आरोग्य शिबीरे लावून रूग्णांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
“वाशिममध्ये 3 महिन्यात 20 डेंग्यू रुग्णांची नोंद”
वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडे जिल्हाभरात 20 रुग्णांची नोंद करण्यात आली. प्रामुख्याने खासगी रुग्णालयात उपचार करण्यावर रुग्णांचा भर आहे. त्यामुळे आरोग्य सेवकांमार्फत शहरात सर्वेक्षण केले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात 3 महिन्यांत 20 रुग्णांची नोंद झाली आहे.
असं असली तरी डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद अद्याप आरोग्य विभागाकडे नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. तुरळक प्रमाणात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. डेग्यू नियंत्रणासाठी गावागावात उपाययोजना केल्या जात आहेत.
हेही वाचा :
झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार
नवी मुंबईत गेल्या वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ
मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा धोका वाढला!
व्हिडीओ पाहा :
Increasing patient of Dengue and Malaria disease in Washim Gondia