Ahmednagar Fire | अहमदनगर रुग्णालय आगीची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी, आयजी दीपक पांडे यांची माहिती
ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याच आदेश दिले. दरम्यान, घडलेल्या घटनेत पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार जाणार आहे. सध्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल. ही माहिती आयजी दीपक पांडे यांनी दिली.
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना घडताच आज राज्यात खळबळ उडाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. तसेच ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला. दरम्यान, घडलेल्या घटनेत पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. सध्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल. ही माहिती आयजी दीपक पांडे यांनी दिली.
अहमदनगर आगीचा पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास
अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात आग लागल्यामुळे एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेले रुग्ण दगावल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. याच प्रकरणाचा स्वतंत्र तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आयची दीपक पांडे यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं होतं ?
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण 11 जणांचा होरपूळून मृत्यू झाला असून काही रुग्ण जखमी झाले होते. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. याच वेळेत बाकीच्या 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं होती. नंतर या घटनेची माहिती होताच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरकडे रवाना झाले होते.
सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
इतर बातम्या :
आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा
येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार; हवामान विभागाकडून 10 जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी
संतापजनक ! थकीत पैसे मागायला जाताच माजी मंत्री भडकले, शेतकऱ्याला थेट शिवी हासडली
(independent inquiry will be conducted by the police in ahmednagar hospital fire case)