महापालिकेत सत्ता आली, पण शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस, जळगावच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?

महापालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन तीन महिने पूर्ण झाले असले तरी या तीन महिन्यात सेनेत गटबाजी वाढली आहे (internal dispute between shiv sena corporators in jalgaon).

महापालिकेत सत्ता आली, पण शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस, जळगावच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?
महापालिकेत सत्ता आली, पण शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस, जळगावच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 10:58 PM

जळगाव : महापालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन तीन महिने पूर्ण झाले असले तरी या तीन महिन्यात सेनेत गटबाजी वाढली आहे. त्यात भाजपने बंडखोर नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवरील नोटीसा नगरसेवकांना प्राप्त झाल्यानंतर काही नगरसेवकांमध्ये चलबिचल वाढली होती. ही चलबिचल लक्षात घेता शुक्रवारी (9 जुलै) रावेर लोकसभेचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी बंडखोर नगरसेवकांची बैठक घेवून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला आहे (internal dispute between shiv sena corporators in jalgaon).

उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या सतराव्या मजल्यावरील दालनात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला विलास पारकर यांच्यासह महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील आणि भाजपचे सर्व बंडखोर नगरसेवक उपस्थित होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारी (10 जुलै) होणाऱ्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच शनिवारी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या मुद्द्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली (internal dispute between shiv sena corporators in jalgaon).

संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याबाबत व्यक्त केली नाराजी

विलास पारकर यांनी घेतलेल्या या बैठकीत बंडखोर नगरसेवकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याबाबत तीव्र नराजी व्यक्त केली. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचीही मागणी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून काढून हे पद पारकरांनी घ्यावे, अशी विनंती देखील बंडखोर नगरसेवकांनी या बैठकीत केली. तसेच स्विकृत नगरसेवकाच्या निवडीबाबत देखील सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे चर्चा केली जाईल, असे आश्वासन पारकर यांनी दिले.

निधी वाटपात विश्वासात घेण्यात आले नाही, नगरसेवकांची तक्रार

महापालिकेत जरी शिवसेनेची सत्ता असली तरी सेनेचे आधीचे नगरसेवक निधीवाटपात बंडखोर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. मनपात गेल्या महिन्यात 8 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर त्या निधीतील सर्व कामे 15 नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात मंजूर करून घेतल्याचीही तक्रार नगरसेवकांनी केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मनपासाठी निधीची तरतूद करून, बंडखोर नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लावण्याचे आश्वासन पारकर यांनी दिले.

घाबरू नका, अपात्रतेचा विषयावरही तोडगा काढू

अनेक नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या अपात्रतेच्या नोटीसांमुळे अपात्रतेची टांगती तलवार असल्याने ही कारवाई लवकर झाल्यास अडचणी येतील, असं काहिंनी सांगितले. त्यावर याबाबत देखील तोडगा काढून चांगल्या वकीलांचा सल्ला घेवून ही लढाई देखील जिंकू, अपात्रतेच्या बाबतीत घाबरू नका, असंही पारकर यांनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : अध्यक्षपदाच्या बदल्यात सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, भास्कर जाधवांचा सल्ला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.