मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस

तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. (devendra fadnavis)

मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 12:31 PM

महाड: तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची किंवा कुणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. सध्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणं आणि नुकसानग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (it’s not time to politics, says devendra fadnavis on taliye incident)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. याप्रसंगी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. ही घटना घडल्यानंतर प्रविण दरेकर सर्वात आधी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. या भागाची आम्ही पाहणी केली. अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. मात्र, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहे. दोन किलोमीटर अंतरावर बॉडी गेल्या आहेत. या मृतदेहांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

केंद्राकडून मदत देऊ

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार मदत करेल. पंतप्रधान आवास योजना आणि एनडीआरएफचं अनुदान घरे बांधण्यासाठी देण्यात येईल. नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

प्रशस्तीपत्रं द्यायला आलो नाही

राज्य सरकारने दुर्घटना घडल्यानंतर चांगलं काम केलं आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, इथे चांगलं किंवा वाईट काम केल्याचं प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही. प्रशस्तीपत्रं देण्याची ही वेळ नाही. मृतदेह बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासन चांगलं काम करत असेल तर त्यांच्या पाठी राहीलं पाहिजे. आज फोकस रिलीफवर असला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर काय केलं पाहिजे याचं आकलन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

पक्की घरं बांधून देणार

ही अत्यंत दुखद घटना आहे. या दुर्घटनेत 87 लोक गेल्याचं कळतं. 44 मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं नारायण राणे म्हणाले. (it’s not time to politics, says devendra fadnavis on taliye incident)

संबंधित बातम्या:

तळीयेतील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देणार; नारायण राणे यांची घोषणा

सांगली पूर : बचावकार्यावेळी महापालिकेची बोट अडकली, नगरसेवकासह सहा जण पाण्यात पडले

चौथ्या दिवशीही तळीयेत 42 लोक गायब; मृतांचा आकडा 43 वर; रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

(it’s not time to politics, says devendra fadnavis on taliye incident)

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.