Karnataka Bus Siezed : सांगलीच्या न्यायालयाचा कर्नाटकला दणका, नुकसान भरपाई न दिल्याने बस जप्त

2015 मध्ये भानुदास बाबुराव भोसले किल्ला भाग मिरज येथून दुचाकीवरून मागे बसून चालले होते. त्यांचा पुतण्या दुचाकी चालवत होता. पुलावरून जात असताना कर्नाटक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भानुदास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता.

Karnataka Bus Siezed : सांगलीच्या न्यायालयाचा कर्नाटकला दणका, नुकसान भरपाई न दिल्याने बस जप्त
अपघातप्रकरणी भरपाई न दिल्याने सांगलीतील न्यायालयाकडून कर्नाटकची बस जप्त
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:32 PM

सांगली : पाठीमागून येणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहनच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी पीडिताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई (Compensation) न दिल्याने सांगलीतील न्यायालयाने कर्नाटकची बस जप्त (Bus Siezed) केली आहे. भानुदास भोसले असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भोसले यांचा पुतण्या या अपघातात गंभीर जखमी झाला होता. अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 9 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने बजावूनसुद्धा भरपाई न दिल्याबद्दल सांगलीतील न्यायालयाने कर्नाटक राज्यातील बस जप्त केली. (Karnataka bus confiscated from Sangli court for non-payment of compensation in accident case)

2015 मध्ये घडली होती घटना

2015 मध्ये भानुदास बाबुराव भोसले किल्ला भाग मिरज येथून दुचाकीवरून मागे बसून चालले होते. त्यांचा पुतण्या दुचाकी चालवत होता. पुलावरून जात असताना कर्नाटक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भानुदास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी भानुदास भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली येथील न्यायालयामध्ये अॅड. आर. एम. भाले यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन भरपाईपोटी 8 लाख 33 हजार 563 रुपये कर्नाटक एसटी महामंडळाने विजया भोसले यांना देण्याचे आदेश 2016 मध्ये दिले होते.

आदेशानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने बस जप्त

गेल्या सहा वर्षात या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे भोसले यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. तेव्हा आदेशानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने अपघातातील बस किंवा कर्नाटक एसटी महामंडळाच्या मालकीची कोणतीही बस जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच बसच्या चाव्या भोसले यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. (Karnataka bus confiscated from Sangli court for non-payment of compensation in accident case)

इतर बातम्या

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; आरोपी मंत्रिपुत्र आशिष मिश्राचा जामीन रद्द

Nawab Malik ED : दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.