Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरमध्ये केएमटीमध्ये तर साताऱ्यातही प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक, प्रशासन ॲक्शन मोडवर

कोल्हापूरमध्ये दोन डोस घेतलेल्या लोकांनाचं केएमटीमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय.

कोल्हापूरमध्ये केएमटीमध्ये तर साताऱ्यातही प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक, प्रशासन ॲक्शन मोडवर
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 9:32 AM

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारनं कोरोना लसीकरणासाठी मोहिम (Corona Vaccination Drive) राबवली आहे. राज्यात ठिकठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्य शासनानं लसीकरण व्हावं यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात केलीय. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) दोन डोस घेतलेल्या लोकांनाचं केएमटीमधून (KMT) प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर, सातारा (Satara) जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय.

केएमटीमध्ये लस घेतलेल्यांनाच प्रवेश

कोल्हापूर शहरातील केएमटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना लसींचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. आता नव्या नियमानुसार दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच केएमटीतून प्रवास करता येणार आहे. ओमिक्रॉंनच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. लसीकरण पूर्ण न करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. पहिला डोस पूर्ण होऊन 84 दिवसापेक्षा अधिक दिवस झालेले शहरात तब्बल 52 हजार नागरिक आहेत.

साताऱ्यातही प्रवासासाठी लस बंधनकारक

सार्वजनिक, खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व खासगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

सार्वजनिक वाहनातून पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोविड सुसंगत वर्तनाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला 500/- रुपये इतका दंड व सेवापुरवठादार यांना 500/- रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच बसेसच्याबाबतीत कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. वारंवार नियमांचं उल्लंघन होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक, एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा किमान दोन दिवस बंद करण्यात येईल, असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

Corona: विदेशातून आलेल्यांची माहिती कळवा,लसवंत नसलेल्या संस्थेला टाळे! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Know This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटला त्या आवर घालणार का?

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.