कोल्हापूर : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अतिग्रे प्राथमिक उपकेंद्रातील आरोग्य सेवक रमेश धोंडीराम कोरवी यांनी उपकेंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होता. तसेच 24 तास काम होते. गरज पडल्यास रजाही मिळत दिली जात नव्हती असा आरोप रमेश कोरवी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी आरोग्य सहाय्यक सुरेश वर्णे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Kolhapur Ichalkaranji Primary Health Care Sub Centre worker commits suicide senior officer arrested)
मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथे जिल्हापरिषदेचे आरोग्य उपकेंद्र आहे. हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अतिग्रे उपकेंद्र कार्यरत आहे. कोल्हापूर येथील रमेश धोडींराम कोरवी हे आरोग्य विभागात गेल्या 18 वर्षांपासून आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. गेल्या चार वर्षापासून हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होते. त्यांच्याकडे अतिग्रे उपकेंद्राचेही काम होते.
शनिवारी (3 जुलै) ते दिवसभर अतिग्रे गावातील लसीकरण केंद्रात होते. लसीकरण संपल्यानंतर सायंकाळी ते कोल्हापूर येथे त्यांच्या घरी गेले. पण पुन्हा रात्री काम असल्याचे सांगून ते रात्री 10 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी अतिग्रे उपकेंद्रात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज (4 जुलै) उघडकीस आली.
रमेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रमेश कोरवी यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या ओरपांनुसार ते सतत तणावात असायचे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना सतत त्रास दिला जायचा. ते 24 तास काम करायचे. तसेच त्यांना रजाही मिळत नसे.
दरम्यान, या सर्व कारणांमुळे त्यांच्या मृत्यूस सुरेश वर्णे हेच कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी रमेश कोरवी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. सध्या सुरेश वर्णे यांना हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या :
Video | हॉटेलमध्ये बसू न दिल्याचा मनात राग, मित्रांना बोलवून सिनेस्टाईल राडा, व्हिडीओ व्हायरल
मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश
ऑनलाईन शस्त्रास्त्र तस्करी, 49 तलवारींसह धारदार शस्त्रं जप्त, औरंगाबादेत आरोपी ताब्यात
(Kolhapur Ichalkaranji Primary Health Care Sub Centre worker commits suicide senior officer arrested)