AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भोवऱ्यात? शिवराज्याभिषेकाचं हे 349 वे वर्ष? इतिहास अभ्यासकाचे सरकारवर ताशेरे

शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल त्यांनी केलाय.

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भोवऱ्यात? शिवराज्याभिषेकाचं हे 349 वे वर्ष? इतिहास अभ्यासकाचे सरकारवर ताशेरे
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 3:07 PM

कोल्हापूर : किल्ले रायगडावर आज दिमाखदार सोहळा पार पडला. कारण आजच्याच दिवशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आज तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. पण हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण काही जणांनी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्याचं यावर्षी 350 वं वर्ष नाही तर 349 वं वर्ष आहे, असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी केला. तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातातच कसे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवराज्याभिषेकाचा संबंध काय? अशा शब्दांत इंद्रजीत सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

इंद्रजीत सावंत नेमकं काय म्हणाले?

“6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकचा 300 वा महोत्सव तत्कालीन राज्य सरकारने जून 1974 ला साजरा केला. यशवंतराव चव्हाण तत्कालीन अर्थमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रायगडावर जाऊन होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या लोकराज्य या अधिकृत मुखपत्रातही तसा उल्लेख आहे. 350 शिवराज्याभिषेक सोहळा 2024 ला आला पाहिजे”, असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘एक वर्ष कुणी खाल्लं?’

“यामागे राजकीय भावना आहेत का? हा राजकीय इव्हेंट करायचा होता का? तिथीनुसार झालेल्या राज्याभिषेकाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जातातच कसे? एक वर्ष कुणी खाल्लं? यावर अभ्यास झाला पाहिजे. शिवराज्याभिषेक आणि सावरकरांचा संबंध काय? चांदीची पालखी सावरकर स्मारकाजवळ लिहून बाहेर आणली. शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या बद्दलची नाटकं सांगणं,पालखी नेणं किती योग्य?”, असा सवाल त्यांनी केला.

“मंडप घालताना पुरातत्त्व शास्त्राचा अभ्यास देखील केला नाही. गोल्स कार देखील नेली गेली. चालण्याची क्षमता देखील या राजकीय नेत्यांकडे राहिली नाही का? पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. हा ईव्हेंट करता येणार नाही म्हणून हे सगळं केलं गेलं का? हा प्रश्न आहे”, असं मत सावंत यांनी मांडलं.

समुद्रातल्या शिवस्मारकाची काय अवस्था आहे? तुम्ही पाहत आहात. प्राधिकरणाची घोषणा करायची पण पैसे कोण देणार? प्राधिकरणाला अधिकार काय असतील? पैसे आणि अधिकार देखील द्यावेत. फक्त हवेतल्या घोषणा सरकारने करू नयेत, अशा शब्दांत इंद्रजीत सावंत यांनी सुनावलं.

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.