“…म्हणून उद्धव ठाकरे यांची कीव येते”; भाजपच्या नेत्याने ठाकरेंच्या चुकांची यादीच वाचून दाखवली
कोणत्याही पक्षाचा आमच्यासोबत आला तरी आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो असं म्हणत याचे उत्तम उदाहरण म्हणजे नारायण राणे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात त्यांनी युतीवर भागवत कराड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एकेरी शब्दात टीका केली होती. त्यानंतर भाजपकडून ठाकरेंवर सडकून टीका करण्यात आली. त्यावरूनच आता राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची कीव येते अशा शब्दात भाजपचे खासदार भागवत कराड यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
खासदार भागवत कराड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करताना एकेरी शब्द वापरायला नाही पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.
तर त्याच वेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता आता वैतागली आहे, ज्या प्रमाणे जनता राऊतांना कंटाळली आहे,
त्याच प्रमाणे आता महिलाही संजय राऊत टीव्हीवर दिसताच त्याही टीव्ही बंद करा म्हणतात अशा खोचक शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तर खासदार भागवत कराड यांनी शिंदे गट आणि भाजप गटाच्या युतीवर बोलतानाही त्यांनी ही युती अभेद्य असल्याचे सांगत शिंदे गट आणि भाजप ही युती एकजीव असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर ठाकरे गटाकडून मंत्री पदासाठी शिंद गट भाजपसोबत गेल्याचा आरोप केला जातो मात्र, त्यावरही बोलताना ते म्हणाल की, शिंदे गट हा भाजपकडे कोणत्याही खुर्चीसाठी आलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
शिंदे गट आणि भाजपच्या युतीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असणार आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हा वरच्या पातळीवरीचा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपचे एक तत्व आहे जो येतो त्याचे स्वागत करून आम्ही आमच्या विचारानुसार घडवतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला मात्र आम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी विचार बदलत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
कोणत्याही पक्षाचा आमच्यासोबत आला तरी आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो असं म्हणत याचे उत्तम उदाहरण म्हणजे नारायण राणे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात त्यांनी युतीवर भागवत कराड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.