संघर्ष करुन पीएचडी मिळवली पण काळाने घाला घातला, कोल्हापुरातील तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू
प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या एका तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Kolhapur Young Professor died due to corona)
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या एका तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मारुती नागोजी पाटील असे या प्राध्यापकाचे नाव आहे. मारुती पाटील हे 38 वर्षांचे होते. सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Kolhapur Young Professor died due to corona)
मारुती पाटील यांना दीड महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूर शहरातील सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडिल आणि लहान परिवार आहे.
मारुती पाटील यांचा अल्पपरिचय
मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी पीएचडी मिळवली होती. कर्नाटकमधील मणिकेरी हे त्यांचे मूळगाव. पण असं असूनही त्यांनी महाराष्ट्रात स्वतःच शिक्षण पूर्ण केले. त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी डिग्री मिळवली होती.
घरची परिस्थिती बेताची असतानाही कोल्हापूर शहरात राहून त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं होतं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी पदवी ग्रहण केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या कौलगे गावात त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून काम करत होते.
अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का
गेल्या दीड महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यावर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील आणि छोटासा परिवार आहे. दरम्यान त्यांच्या अशा अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंचा फोन, ‘मिलना हैं, अब मेरे साथ दो साथी है’, मोदींचा लगोलग रिप्लाय; राऊतांच्या ‘रोखठोक’मधून इनसाईड स्टोरी https://t.co/bH8nTkhBkz#NarendraModi #UddhavThackeray #UddhavMeetModi #sanjayRaut @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2021
(Kolhapur Young Professor died due to corona)
संबंधित बातम्या :
आता लसीकरण केंद्रावर येण्याची गरज नाही?, घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!
शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करु नये, अतिवृष्टीमुळे बियाणं वाया जाईल; कृषी विभागाचा सल्ला
कोरोना तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक, पालकांनी संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या : छगन भुजबळ