Gadchiroli Elephant | हत्ती स्थलांतरणाच्या मुद्यावरून विरोध होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प; गडचिरोली रिपोर्टर फोरममध्ये रंगली चर्चा
गडचिरोलीचे पालकमंत्रीदेखील हजार किलोमीटर लांब राहतात. त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीची जाण असेलच असे नाही. त्यांनी विशेष करून यात लक्ष द्यावे. हत्ती व कॅम्पच्या संवर्धनासाठी जो काही निधी लागत असेल तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही जांभुळे यांनी केली आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात प्रसारमाध्यमातील स्थलांतराच्या मुद्द्यावर अनेक प्रयत्न करीत आहेत. अनेक वृत्तपत्रात अनेक प्रसार माध्यमांमध्ये बातम्या दिसू लागल्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार या मुद्द्यावर गप्प बसले आहेत. हत्ती स्थलांतराच्या विरोध आमदार व खासदार करणार का असा प्रश्न आम जनतेला पडलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये (Kamalapur Elephant Camp) एकूण 8 हत्तींच्या समावेश आहे. यातून चार हत्ती गुजरात राज्यातील जामनगर (Jamnagar in Gujarat State) येथे स्थलांतर करण्याचे आदेश केंद्र सरकारने पारित केले. या अगोदरही हत्ती स्थलांतराचा मुद्दा खूप गाजला होता. त्यावेळी अनेकदा स्थानिकांनी विरोध केल्यानंतर स्थलांतर काही वेळासाठी थांबविण्यात आले. परंतु आता पुन्हा केंद्रसरकारने वन विभागाच्या (Forest Department) नावाने आदेश काढून चार हत्तींना स्थलांतर करण्यात यावे, अशी सूचना दिली.
अनिकेत आमटे म्हणतात, आम्ही विरोध करू
या हत्ती स्थलांतर यांच्याविरोधात व्हाट्सअप गृपवर चर्चासत्र सुरू आहे. गडचिरोली रिपोर्टर फोरम नावाने असलेल्या गृपमध्ये हत्ती स्थलांतराची चर्चा खूपच रंगली. अनेक सेवानिवृत्त मोठे अधिकारी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राज्याचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांचा मुलगा व लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी हत्ती स्थलांतराच्या विरोध आम्ही नक्कीच करू अशी चर्चाही यानिमित्तानं झाली. हत्ती स्थलांतर थांबू शकेल का, असा प्रश्नही आम जनतेला पडलेला आहे. कारण की केंद्र सरकारच्या आदेशाने जामनगर येथील एका मोठ्या व्यापाराच्या मुलाच्या खासगी संस्थेला हे हत्ती स्थलांतर होणार आहेत. त्यामुळं आम जनता कमलापूर येथील लोकप्रिय हत्ती दूर होणार, अशी चिंता व्यक्त करत आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांनीही हत्ती गडचिरोलीची शान आहे. त्यांचे स्थलांतर होऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली.
पर्यटनस्थळ वाचविण्यासाठी जनता सरसावली
राज्यातील वनवैभव व एकमेव पर्यटनस्थळ वाचविण्यासाठी आता सर्वच जण सरसावल्याचे चित्र आहे. नक्षल्यांचे माहेरघर म्हणून कुप्रसिद्ध असलेला कमलापूर परिसर काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हत्ती कॅम्पमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले. राज्यातील कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देतात. त्यामुळं नक्षली कारवायादेखील कमी झाल्या. येथील नागरिकांना नवा रोजगार मिळाला. असे असताना हे हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने वाढविण्याचे सोडून केंद्र सरकार हस्तक्षेप करून येथील हत्ती प्राणिसंग्रहालयाची शोभा वाढविण्यासाठी गुजरातला पाठवीत आहे. हा डाव येथील जनता यशस्वी होऊ देणार नाही असे युवक काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे.