Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर: अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगीची घटना मनाला व्यथित करणारी असल्याचं म्हटलं आहे. तर, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. #AhmednagarFire https://t.co/WEmRk4n18Y— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 6, 2021
पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो तर जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा मुख्य सचिव आहेत. हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत मदतीची घोषणा कराावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
शॉर्ट सर्किटमुळं आग
राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते.
इतर बातम्या:
Maharashtra Ahmednagar District Civil Hospital Fire broke out live update ten died LOP Devendra Fadnavis demanded probe of fire