अमरावतीची ‘निरजा’, तालिबान्यांना घाबरली नाही, 129 प्रवाशांना मायदेशी आणलं, यशोमती ठाकूरांचा सॅल्यूट

| Updated on: Aug 18, 2021 | 8:18 AM

एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं.

अमरावती : अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या 129 भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. ए आय 244 या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं.

श्वेता शंकेच्या कामगिरीचं सध्या देशात कौतुक केलं जातंय. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरुप परत देखील घेऊन आलं. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राची लेक श्वेताचा देखील समावेश आहे. श्वेताच्या आई-वडिलांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतोय.

महाराष्ट्राच्या ‘निरजा’ची शौर्यगाथा

अफगाणिस्तानमध्ये अराजकता माजली आहे. देश सोडण्यासाठी जीवाच्या भीतीने अनेक नागरिक विमानतळाकडे धाव घेत आहेत. अनेकांनी विमानावर लटकून प्रवास करण्याचाही प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले. तसेच याठिकाणी गोळीबार देखील झाला होता. इतकी भयंकर परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानातून भारतीयांना आपल्या मायदेशी सुखरुप आणण्यासाठी दर्यापूरची लेक श्वेता चंद्रकांत शंके हीने आपल्या सहकाऱ्यांसोबत अफगाणिस्तानातील काबूलमध्ये गेली होती .

भारतातून पाठविलेल्या विमानात श्वेता ही हवाई सुंदरी म्हणून गेली होती. अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतले आणि आज 129 भारतीयांना घेऊन विमान यशस्वीपणे भारतात दाखल झालं. श्वेता ही दर्यापूरमधील बाभळी येथील शिवाजी चौकात राहते… राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेता शंके यांच्याशी फोनवरून बातचीत करून अफगाणिस्तानमधील ग्राउंड परिस्थिती काय आहे, हे समजून घेतलं आणि श्वेताला धीरही दिला.

यशोमती ठाकूरांचा श्वेता शंकेला फोन

अफगाणिस्तानातून भारतीयांना सुखरुप परत आणणारी ‘निरजा’ श्वेता हिच्याशी महाराष्ट्राच्या मंत्री यशोमती ठाकूरांनी संवाद साधला. ताई, बाहेर गोळ्यांचे आवाज येत होता. पण आम्ही मोहिम फत्ते केली, असं श्वेताने मंत्री महोदयांना सांगितलं.

अमरावतीच्या दर्यापूर इथे राहणारी श्वेता अफगाणिस्तानहून तिथल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्याच्या मिशन मध्ये सामील होती. श्वेता आणि टीमने मोहिम फत्ते केल्यावर तसंच श्वेताचं शौर्य समजताच महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताला फोन केला. काळजी घे पोरी, काही लागलं तर फोन कर, असं हक्काने सांगून यशोमती ठाकूर यांनी श्वेताचं मनोधैर्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला.

मला तुम्हाला भेटायचं आहे, असं म्हणून श्वेता आपले अनुभव यशोमती ठाकूर यांना सांगत होती तितक्यात विमान रनवेवर आलं… अमरावतीला आले की भेटायला येते, असं बोलून हा संवाद संपला. संपूर्ण महाराष्ट्राला गर्व वाटावा, अशी कामगिरी महाराष्ट्राच्या निरजाने केलीय… तिच्या कर्तृत्वाला लाख लाख सलाम…!!

(Maharashtra Amravati Girl shweta Shanke Brought 129 Indians From Afganistan)

हे ही वाचा :

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

अफगाणिस्तानच्या घडामोडींमध्ये नवं ट्विस्ट, आता मीच काळजीवाहू राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सालेहकडून घोषणा

680 रुपये असलेला बदाम अचानक हजाराच्या वर कसा गेला? अफगाण युद्धाचे परिणाम थेट तुमच्या खिशावर?

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी

Published on: Aug 18, 2021 08:12 AM