Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.
मुंबई: पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मिरच्या किश्तवाडमध्ये भूकंपाचा तीव्र झटका जाणवला आहे. तर पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिकच वाढलं आहे. यासह राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
यवतमाळ : दारुच्या वादातून खून
दारू व्यवसायाचा वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या
दोन संशयित लोहारा पोलिसांच्या ताब्यात
दारू विक्रीच्या जुन्या वादातून 30 वर्षीय तरुणाची हत्या
शहरातील पिंपळगाव मार्गावर असलेल्या परिसरातील एका शेतातील घटना
पंकज उर्फ लल्ला कोराळे (30 रा. बांगरनगर) यवतमाळ असे मृतकाचे नाव
-
पुणे : नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
कुकडी नदीतील रांजणखळग्यात फोटो काढताना पाय घसरून पडला
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील चास येथे घडली घटना
साईप्रसाद वेण्णापुसा असं १८ वर्षीय बुडालेल्या तरुणाचे नाव
नारायणगाव येथील रा. प. सबनीस विद्यालयाचा विद्यार्थी
मित्रांसोबत फिरायला आला असताना पाय घसरून बुडाला
-
-
-
काॅम्रेड गोंविद पानसरे हत्या प्रकरण
संशयित सर्व आरोपी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर,
जिल्हा न्यायाधीश एस एस तांबे यांचासमोर सर्व आरोपींना केलं हजर,
सर्व संशयीत आरोपींकडून न्यायालयात हत्या न केल्याची कबूली,
यामुळे सर्व संशयित आरोपींवर दोषारोप (चार्ज फ्रेम) ठेवण्यात आला,
हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार.
-
त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी डोंगराजवळ यात्रेकरूंच्या खासगी बसला अपघात
13 लोक जखमी त्यातील दोघांची प्रकृती गंभीर,
सर्वजण बुलढण्यातील रहिवासी,
जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले.
-
-
देशात समान नागरी कायदा लागू होणार?
समान नागरी कायद्याबाबत करण्यात आलेलं परीक्षण योग्य: सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशात समान नागरी कायदा लागण्याची शक्यता
समितीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
कलम 162 अंतर्गत समिती स्थापनेचा अधिकार राज्यांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत
परीक्षण न्यायालयाकडून मान्य झाल्याने समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता
-
औरंगाबाद शहरातील कंचनवडीत पतीकडून पत्नी व मुलाची हत्या
पत्नी व मुलाची हत्या करून पती पोलीस ठाण्यात हजर
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना
कौटुंबिक वादातून केली पत्नी व मुलाची हत्या
-
पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर
CBSEच्या आणखी 10 शाळांची करण्यात आलीए चौकशी,
पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी केली चौकशी,
CBSE शाळांना शासनाचं ना हरकत प्रमाणपत्र बोगस दाखवले असल्याची धक्कादायक माहिती पुण्यात उघड झाली होती,
याधी पुण्यात तीन शाळांनी असे केल्याचे प्रकरण उघडकीस आल होत,
त्याच अनुषंगाने आता या नव्या दहा शाळेची चौकशी होणार आहे.
-
किशोरवयीन मुलींसाठीच्या सुविधेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : प्रत्येक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, सर्व सरकारी, निवासी आणि अनुदानित शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र,
स्वच्छतागृहांची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,
काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांच्या जनहित याचिकेवर आज होणार सुनावणी,
CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर होणार सुनावणी.
-
औरंगाबादमध्ये थंडीची लाट तर दुसरीकडे कोरोनानेवर काढले डोके
औरंगाबादमधील 34 वर्षीय युवक निघाला कोरोना बाधित
संपर्कातील नागरिकांची तपासणी केली असता अहवाल नकारात्मक
तपासण्यांवर जोर तर महानगरपालिका हाय अलर्ट मोडवर
घाबरण्याची परिस्थिती नाही, मात्र काळजी घेणे गरजेचे
-
नाशिकच्या निफाडमध्ये पुन्हा पारा घसरला
नाशिक : निफाडचा पारा घसरला,
कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद..
यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद.
ढगाळ वातावरण कोरडे झाल्याने उत्तरेकडून थंड वारी थेट दाखल होत असल्याने किमान तापमानात घसरण.
-
दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर 15 दिवसांचा मेगा ब्लॉक
रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी 10 ते 25 जानेवारी दरम्यान घेतला जाणार मेगा ब्लॉक
ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या होणार रद्द
तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही होणार मोठा बदल
15 दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मात्र होणार हाल
-
पुण्यात महाराष्ट्र किंग ॲंड क्विन 2023 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार,
भाजपा सांस्कृतिक विभागाने बावधनमध्ये केलंय कार्यक्रमाचं आयोजन,
आज संध्याकाळी सात वाजता पार पडणार कार्यक्रम.
-
कोगनोळी गावात चोरट्यांचा सशस्त्र दरोडा
महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी गावात चोरट्यांचा सशस्त्र दरोडा
घरातील व्यक्तींना मारहाण करत एका रात्रीत फोडली पाच घरे
चोरट्यांच्या मारहाणीत शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह आणि मुलगी जखमी
30 तोळे दागिन्यासह रोख रक्कम केली लंपास
शस्त्र दरोडाच्या प्रकारामुळे कोगनोळी सह परिसरात भीतीच वातावरण
-
नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घट
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारा 8 अंश सेल्सिअसवर
सपाटी भागात तापमान 11 अंश सेल्सिअस
वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम
डोंगराळ भागात वातावरणात दुपारपर्यंत गारठा
थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार
तोरणमाळ परिसरात दाट धुके
-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडी झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष
सोलापूर क्रिकेटप्रेमींकडून इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला जल्लोष
क्रिकेट खेळाडूंना लाडू भरवून जल्लोष करण्यात आला
काँग्रॅच्युलेशन्स रोहित दादा म्हणत खेळाडू आणि समर्थकांनी जल्लोष केला
-
राज ठाकरेंच्या पुण्यातील कार्यक्रमात मनसेचे नेते वसंत मोरे एक तास राहिले उभे
पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात अशोक सराफ यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम
या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी लावली होती हजेरी
मनसेचे इतर सर्व नेते या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसलेले पाहायला मिळाले
मात्र वसंत मोरे हे कार्यक्रम संपेपर्यंत उभे असलेले पाहायला मिळाले
-
उल्हास नदीत प्रदूषित नाल्याचं पाणी
म्हारळ गावाजवळील नाला थेट उल्हास नदीत
50 लाख लोकांची तहान भागवणारी नदी प्रदूषित
त्यामुळं तब्बल 50 लाख लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय
-
विश्वकर्मा जयंतीची देशासाठी सुट्टी जाहीर करा: विनायक राऊत
खासदार विनायक राऊत संसदेच्या अधिवेशनात सुट्टीची मागणी करणार
चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्हा पांचाळ सुतार समाज संघाच्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यात विनायक राऊत यांचं वक्तव्य
राज्यात रामनवमी, शिवजयंतीला सुट्टी असते मग जगाच्या सृष्टीच्या निर्मात्याच्या जयंतीला सुट्टी का देत नाही: राऊत
-
भाजप आमदार मंगेश चव्हाण झाले मुख्यमंत्र्यांच्या रथाचे सारथी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावच्या पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर
यावेळी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या गाडीचे सारथी झाल्याचे पाहायला मिळाले
मंगेश चव्हाण यांनी पाचोऱ्यापासून थेट जळगावपर्यंत मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन हे देखील गाडीत बसलेले होते
Published On - Jan 09,2023 6:20 AM