मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर की स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून अजूनही वाद सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. आजही या मुद्द्यावरून शाब्दिक चकमकी उडण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे उत्तराखंडातील प्रसिद्ध जोशीमठ ढासळण्याच्या स्थितीत आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.
विजेचा झटका बसून ऐमन बिराजदार या चिमुकलीच्या मृत्यूचे प्रकरण
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर 26 तासानंतर अखेर आंदोलन मागे
महावितरणच्या प्रचलित नियमानुसार मयत मुलीच्या कुटुंबीयांना केली जाईल मदत
महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांचे मृत मुलीच्या कुटुंबीयांना पत्र
लेखी आश्वासनानंतर प्रहार संघटना आणि परिवाराने आंदोलन घेतले मागे
चिमुकली मृतदेह कुटुंबीयांनी घेतला ताब्यात
भवानी पेठेतील हॉटेलची कोयता गँगने दहशत माजवत केली तोडफोड
हॉटेलमध्ये घुसून पाच ते सहा जणांनी कोयत्याने केली तोडफोड
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर
याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नाशिक : एकलव्य मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्न त्याग आंदोलन,
जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांचे सकाळपासून उपोषण,
निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थ्यांची तक्रार,
वारंवार तक्रार करूनही जेवण निकृष्ट येत असल्याचा आरोप,
जेवणात वारंवार अळी आढळत असल्याची तक्रार,
नाशिकच्या आरटीओ कार्यालय परिसरात ही शाळा.
शाळा दररोज पुण्यातील शनिवारवाड्याला भेट देतायेत
चिमुकल्यांची गर्दी शनिवारवाड्यावर पाहायला मिळतीये
राज्यातून विविध शाळांच्या शैक्षणिक सहली पुण्यात येतायेत
मुंबई आणि दिल्लीवरून येणाऱ्या दोन्ही विमानाची लँडिंग रद्द
मुंबईहुन आलेले विमान अर्धा तास घिरट्या घालून मुंबईल रवाना
तर दिल्लीहून आलेले विमान मुंबई विमानतळाकडे वळवले
खराब हवामानामुळे औरंगाबाद विमानतळावर लँडिंग ला अडथळे
तर हैदराबाद वरून आलेले विमान एक तासानंतर उतरले धावपट्टीवर
नवी दिल्ली व उत्तर प्रदेशात थंडीचा कहर
तापमान 1 व 2 अंशावर आले
थंडीमुळे रक्त गोठू लागले
ह्रदयविकाराचे रुग्ण वाढू लागले.
कानपूरमध्ये २४ तासांत २५ जणांचा ह्रदयविकाराने मृत्यू
तीन बिलडर्स आणि सी.ए. वर इनकम टॅक्सची छापेमारी
रोख रक्कम, लाॅकर आणि कागदपत्र जप्त
व्यावसायिकांचे कार्यालय आणि घर अशा 14 ठिकाणी छापेमारी
नाशिक, मुंबई आणि नागपूरातील 175 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी
अहमदनगर : रब्बीच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता,
मोठ्या प्रमाणात धुकं पसरल्याने वाहन चालकांना देखील करावे लागते कसरत,
तर गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक मॉर्निंग वॉकला.
24 नंबर वॉर्डमध्ये राऊंड घेताना रुग्णाने केला हल्ला
सर्व संतप्त शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयाचे गेट बंद करून पुकारले आंदोलन
याआधी डॉक्टर अशोक पालची झाली होती हत्या, त्यामुळे विद्यार्थी आजच्या घटनेने झाले संतप्त
मेडिकल स्टोअर्सला औषध खरेदी करत पैसे ऑनलाईन पाठवल्याचे भासवून फसवणूक
कल्याण खडकपाडा पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल, एकाला ठोकल्या बेड्या
रोशन गुप्ता असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून मुख्य आरोपी आयुष्यमान मिश्रा याच्या शोधत पोलिसांची टीम उत्तरप्रदेशमध्ये रवाना
सदर प्रकारानंतर दुकानदाराने दुकान सोडून काढला पळ
छेडछाडीच्या या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन छेड काढणाऱ्या दुकानदारास घेतले ताब्यात
संतापलेल्या भावांनी भर चौकात तरुणावर केला चाकूने हल्ला
आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचे माहित पडताच या हल्लेखोर भावांनी काढला पळ
टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल