मुंबई : शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार. केदारनाथ धाम येथे बर्फवृष्टीचा अलर्ट. 30 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन बंद. दिल्लीतही जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या बारसू सड्यावर सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हेक्षण सुरू राहणार. पोलिस बंदोबस्तात होणार सर्व्हेक्षण. मी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार.
धांदरफळ / अहमदनगर
शेतकऱ्यांचा निघालेला लाँग मार्च
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल
उद्या महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत आंदोलकांच्या भेटीला
मागण्या संदर्भात होणार सविस्तर चर्चा
सकाळी सात ते आठ वाजता आंदोलकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती
भेटीनंतर ठरणार आंदोलकांची पुढची भुमिका
भेटीनंतर समाधान न झाल्यास लाँगमार्च निघणार महसूलमंत्र्यांच्या घराकडे
महागाई भत्त्यात पुन्हा मोठी वाढ
मोदी सरकार करणार मालामाल
कर्मचाऱ्यांची चारही बोटं तुपात
इतका वाढू शकतो आता पगार, वाचा बातमी
चांदी हिसकावणार सोन्याचा ताज
सोन्यापेक्षा आतापर्यंत सर्वाधिक परतावा
सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचा हिरमोड
सोन्यापेक्षा चांदीतून मिळणार मोठा परतावा
असा होणार ग्राहकांना फायदा, वाचा बातमी
कोल्हापुरात होत असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादाचे ग्रहण सुटेना
स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना महिला कार्यकर्त्यांचा विरोध
उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
बृजभूषण सिंह यांचे शहर भर लागले पोस्टर
ब्रूजभूषण सिंह कोल्हापुरात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार
बृजभूषण सिंह यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांचा आक्षेप
राजमाता जिजाऊ संघटनेचा इशारा
वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार वनोजा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा
शेलुबाजार शहरातील आठवडी बाजारपेठमधील अनेक पाले उडालीॉ
अनेकांच्या घरावरचे टिनपत्रे उडून गेली
पगार इतका की तोंडात जातील बोटे
कर्मचाऱ्यांकडे असावे लागते तांत्रिक ज्ञान
तांत्रिक ज्ञानासोबतच असावा लागतो बहुभाषिक
देशात सध्या दोन स्टोअरची सुरुवात
लवकरच देशात आयफोन तयार होणार, वाचा बातमी
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात प्रचंड गारपीट
दीवठाणा, काळेगाव, निमकवळा गावात गारपीटीने शेतकरी हैराण
हवामान खात्याने दिलेला अंदाज ठरला खरा
अवकाळी ढगांची बुलढाण्यात कोसळधार
शेतकरी मेटाकुटीला
या परिसरातील कांदा पिकांचे मोठं नुकसान
गडचिरोली शासकीय योजनांच्या जत्रा कार्यक्रमातून परतताना ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली
दोन महिला ठार तर महिला 10 जखमी
सिरोंचा तालुक्यातील चिटुर या दुर्गम भागात होती शासकीय योजनांची जत्रा
लक्ष्मी देवपेटा येथील स्थानिक चेटुर गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने गेले होते
परत येत असताना रंगधामपेठा जवळ चालकाच्या नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर टाॅली पलटली
जखमी महिलांना सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले
अकोले / अहमदनगर
किसान लॉंगमार्च सुरूवात
अकोले ते लोणी असणार लॉंगमार्च
लोणी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ
शेतकरी, कामगार, श्रमिकांच्या विविध प्रश्नी लॉंगमार्च
किसान सभेचे डॉ.अजीत नवले, ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ, किसान सभेचे अशोक ढवळे, आ.विनोद निकोले यासह राज्यातील प्रमुख नेते मोर्चात सहभागी
महिला तसेच पुरूष आंदोलक हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी
डी जे च्या तालावर कपडे काढून रात्री उशिरापर्यंत डान्स
डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी इथं घडला गंभीर प्रकार
कोणतीही परवानगी नसताना तरुणांनी केला धांगडधिंगा
कारवाई करण्यासाठी विद्यार्थी संघटनांची विद्यापीठाकडे मागणी
विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक हाकलून बाहेर काढत असताना देखील तरुण ऐकत नव्हते
डी जे साठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची देखील विद्यापीठ प्रशासनाची माहिती
मे महिन्यात बँकांना इतक्या दिवस सुट्टी
कामे पटापट घ्या उरकून, नाहकची धावपळ वाचेल
बँकांना शनिवार,रविवार व्यतिरिक्त या दिवशी सुट्टी
इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईनचा करता येईल वापर, वाचा बातमी
१) जोगा सुडी
२) मुन्ना राम कडती
३) संतोष तामो
४) दुल्गो मण्डावी
५) लखमु मरकाम
६) जोगा कवासी
७) हरिराम मण्डावी
८) राजु करटम
९) जयराम पेडियाम
१०) जगदिश कवासी
११) धनीराम कवासी चालक सिविलियन
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी भू सुरंग स्फोट घडविला
आरनपूर जंगल परिसरातून कोमिंग ऑपरेशन करून परत येत असताना हा भू सुरंग स्फोट घडविण्यात आलाय
यात आमचे दहा पोलीस जवान व एक सिविलियन चालक शहीद झाले
या चार वर्षात 60% नक्षलवाद संपविण्यात आम्ही यशस्वी झालो
या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली असून काही बाबी गुपित रहावे म्हणून मी सविस्तर बोलू शकत नाही
छत्तीसगड दंतेवाडा जिल्ह्यात भू सुरंग स्फोटात 10 जवान व 1 चालक शहीद
दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पालनार मार्गावर नक्षलवाद्यांनी मोठा भू सुरंग स्फोट घडविला
काल रात्री आलेल्या पावसामुळे काही जवानांना या भागातील जंगलात अडकले होते
या जवानांना आणण्यासाठी DRG चा एक पथक अरनपुर पालनार या मार्गावर जात असताना नक्षलवाघांनी भू सुरंग स्फोट घडविला
दोन्ही बाजूंनी चकमक सुरू असून या ठिकाणी अधिक पोलीस बल पाठवण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी दिली
दंतेवाडा हल्ल्यानंतर अमित शहा यांच्याकडून घेतला जातोय आढावा
आज पासून दोन दिवस अमित शहा यांचा नियोजित नागपूर दौरा
अद्यापही नागपूर दौऱ्याबाबत संभ्रम
छतीसगडमधील दंतेवाडा येथे हा हल्ला झाला
हल्ल्यात १० जवान आणि चालकाचा मृत्यू झाला
IED स्फोटाने हा हल्ला करण्यात आला
कर्नाटकात हनुमानाचा जन्म झाल्याचं मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात केलं वक्तव्य
नाशिकच्या साधुमंतांकडून मात्र योगींच्या वक्तव्याचा विरोध
योगींचे काम स्तुत्य, मात्र त्यांनी धर्मात राजकारण करू नये असा दिला सल्ला
चाहत्यांसोबत सेल्फी घेणं अभिनेत्याला पडलं महागात,
बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात केलं दाखल… कशी आहे आता अभिनेत्याची प्रकृती?… वाचा सविस्तर
कल्याण पूर्वेकडील नवी गोविंदवाडी परिसरातील धक्कादायक घटना
बी एस यू पी प्रकल्पातील इमारतीच्या घरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला
हल्ल्यानंतरचा तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
साजिद शेख असं जखमी तरुणाचे नाव, तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू
डोंबिवली टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरु, क्षुल्लक वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर
राउत यांची सायंकाळी दौंड तालुक्यातील वरवंड येथे जाहीर सभा
आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचारचे आरोप केल्यानंतर राऊत दौंडमध्ये घेणार सभा
गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाताना घडली धक्कादायक घटना,
आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट; वाहतूक संथ गतीने सुरू
नाशिक : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसांकडे मागणी
पान टपरीवर QR कोड लावल्यास पोलीस गस्त घालतात की नाही हे वरिष्ठांना कळेल
शहरात सध्या हत्या, गॅंग वॉर आणि गुन्हेगारीचा कळस
पोलिसांची गस्त नसल्याने शहरातील गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अहमदनगर : कालची मुंबई येथील बैठक म्हणजे केवळ फार्स
शेतक-यांचे प्रश्न सरकार गांभिर्याने घेत नाही अस दिसतय
आम्ही कोणताही विषय प्रतिष्ठेचा केलेला नाही
आमची चर्चेची तयारी आहे मात्र चर्चा गांभीर्याने व्हावी हि आमची अपेक्षा
विखे पाटील यांच्या विधानावर अजित नवले यांची प्रतिक्रीया
मोर्चेकरी प्रतिष्ठेचा विषय करत असल्याच विखे पाटील यांनी केल होत विधान
पुणे : 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय
कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
छत्रपती संभाजीनगर : तक्रार दाखल करून कारवाई करत आहोत
ज्या दिवशी घटना घडली तिच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला
चार जणांनी छेडछाड करून तिला मारहाण केली
आज व्हीडीओव्हायरल होत आहे
आम्ही वरिष्ठांच्या परवानगी घेऊन गुन्हा दाखल करत आहोत
बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांची माहिती
कोल्हापूर : सध्या बदल्यांचा सीजन आहे
सर्वसामान्यांना किळस यावा अशी या बदल्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा आहे
पैसे देऊन पोस्टिंग घेणारा माणूस वसूल करायचा प्रयत्न करतोय
पैसे देऊन आलेला माणूस सामान्यांना वेठीस धरतोय
बदलीसाठी एक रुपयाही देणार नाही, असा कणखरपणा अधिकाऱ्यानी दाखवला पाहिजे
सवय लोकप्रतिनिधींनी लावलेली आहे, त्यामुळे साफसफाई ची सुरुवात त्यांच्यापासूनच सुरू झाली पाहिजे
गडचिरोली : बोगस कागदपत्रे तयार करून पोलीस भर्तीत प्रवेश मिळवणाऱ्या प्रकरणात एकूण सात जणांना अटक आज काही आरोपींना अटक करण्यात आली
तीन आरोपींना बीड जिल्ह्यातुन अटक करून गुन्हे शाखेने गडचिरोलीत चार दिवसापूर्वी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले होते
पोलीस भरतीतील उमेदवारासह एका वनरक्षकालाही पोलीस विभागाने आज अटक केली
बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण केली होती
प्रकल्पग्रस्ताचे खोटे दाखले देऊन पोलीस भरतीत प्रवेश घेतला
खोटे दाखले सादर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते
यातील काही आरोपींना आज अटक करण्यात आली
पुढील तपास गडचिरोली गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत
चंद्रपूरमध्ये 28 आणि 30 एप्रिल रोजी बाजार समितीसाठी निवडणुक होत आहेत.
12 बाजार समितीच्या प्रत्येकी 18 अशा 216 संचालक पदांसाठी 476 उमेदवार रिंगणात आहेत.
747 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह एकूण 13197 मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बाजार समित्यांच्या या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे.
भद्रावती बाजार समितीत भाजपने उमेदवारच दिला नाही.
मुल बाजार समितीत केवळ दोन पक्ष समर्थीत उमेदवार रिंगणात आहेत.
ब्रम्हपुरीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप युती अस्तिवात आली आहे.
गोंदिया : जिल्ह्यात आता पर्यंत 309 अपघात…..
अपघात 185 लोकांनी गमावले आपले प्राण….
गंभीर जखमी मध्ये 219 लोकांचा समावेश…
मागील अनेक वर्ष पासून अपघातात सतत वाढ होत आहे…..
जिल्ह्यात 8 ठिकाणी ब्लॅक स्पॉट (अपघात स्थळ)….
अनेक अपघात विरुद्ध दिशेने वाहन चालविल्या मुळे…
पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बैठकीपूर्वीच चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर भारती विद्यापीठामधील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी केली…सविस्तर वाचा
पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ही या बैठकीला उपस्थित रहाणार होते.
या बैठकीआधी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोहोचले.
गाडीतून उतरताच त्यांनी कार्यकर्त्यांना अजित दादा आले आहेत का की आज देखील गायब झाले असा टोला लगावला.
मात्र, त्यांच्या या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी अवाक् झालेले पहायला मिळाले.
सांगलीच्या कुपवाड येथील जुना मिरज रोडवरील महादेव मंदिर परिसरात लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडलीय.
अनिल बाबाजी शिंदे असे मोठ्या भावाचे नाव असून तो व्यवसायाने डॉक्टर होता.
त्याचा लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे याच्याबरोबर कौटुंबिक वाद होता.
या वादातूनच संपत याने डॉक्टर अनिल याच्यावर खुरप्याने हल्ला करून त्याचा खून केला.
या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
– क्रॉस पार्टी रिलेशन अलीकडच्या काळात खूप अवघडं झाले आहे.
– दुसऱ्या पार्टीचा माणूस म्हणजे दुश्मन आहे असे आजकाल राजकारणी वागत आहेत.
– आज असे काही राजकारणी आहेत की ते लोकांनी उभे केलेल्या संस्था ताब्यात घेऊन शिक्षण महर्षी झाले.
– मात्र, पतंगराव कदम यांनी शुन्यातून संस्था उभ्या केल्या.
– पतंगराव कदम यांचं क्रॉस पार्टी रिलेशन चांगलं होते.
हिंगोली येथे अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील डोगरकडा शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकसान झालेल्या पिकांची माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंचनामे करण्याचे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
एकाच नंबरवरुन अनेक ठिकाणी वापरता येईल
4 डिव्हाईसमध्ये चालवा WhatsApp
मोबाईल बंद पडला तरी आता नाही टेन्शन
असा करा या नवीन फिचरचा वापर, वाचा सविस्तर
देशाला एका उत्तम गृहमंत्र्यांची गरज – संजय राऊत यांचे वक्तव्य
अमित शाह देशाचे गृहमंत्री कमी, भाजप नेते जास्त
देशाला नि:पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे
कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार राहणार उपस्थित
पुणेकरांच्या पाणी प्रश्नावर आज निर्णय
पुण्याला उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होणार की कपात ?
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार बैठकीत एकत्र येणार
मुंबई व आसपासच्या परिसरात गुरूवारी अवकाळी पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे
सावता नगर परिसरात आपसातील वादातून हत्या झाल्याची शक्यता
गँगवॉरच्या वर्चस्वावरून हत्या झाल्याचा संशय
गेल्याच आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यावर झाला होता गोळीबार
या घटनेशी संबंध आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू
अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकात अनेक बॅनर लावण्यात आले आहेत..
वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का…!
काल अजित पवारांच्या सासुरवाडीत मुख्यमंत्रीपदासाठी साकडं, आज उपराजधानीत बॅनरबाजी; संकेत काय?
खारघरमधील उष्माघाताचा आणखी एक बळी
मुरबाडमधील श्री सदस्याचा उपचारांदरम्यान मृत्यू
खारघर घटनेनंतर आठवडाभर सुरू होते उपचार
खारघरच्या मृतांमध्ये समावेश करता येणार नाही – तहसीलदारांची भूमिका
काल रात्री झालेल्या गारपीटीमुळे कोंबड्यांचा मृत्यू
एक लाख १२ हजार रुपयांचे शेतकऱ्याचं नुकसान
पोल्ट्री उद्योजकाची नुकसान भरपाईची मागणी
अजित पवार यांच्यासाठी नागपूरमध्ये अनेक बॅनर लावण्यात आले आहेत..
वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का…
काल अजित पवारांच्या सासुरवाडीत मुख्यमंत्रीपदासाठी साकडं, आज उपराजधानीत बॅनरबाजी; संकेत काय?
या किरकोळ सामानातून कमाविला इतक्या कोटींचा निव्वळ नफा
गुंतवणूकदारांना पण देणार नफ्यातील हिस्सा
टाटा कन्झ्युमरने इतके टक्के लाभांश केला जाहीर
गेल्या वर्षातील तिमाहीपेक्षा सर्व रेकॉर्ड तोडले, वाचा बातमी
राजधानी दिल्लीतील मथुरा रोड वरच्या डीपीएस स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल
प्रशासनाला मेल आल्याने मोठी खळबळ
बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस शाळेत दाखल
शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती
यापूर्वीही एका शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल प्रशासनाला आला होता
शिवसेना नेते संजय राऊतांची आज भाजप आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे
दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होईल
राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात भष्ट्राचार झाल्याचा संजय राऊतांनी केला होता आरोप
सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चंदीगड येथे जाणार आहे.
आज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात बादल यांचं पार्थिव ठेवलं जाणार
प्रकाश सिंग बादल यांचं काल रात्री साडे आठ वाजता झालं होतं निधन, ते 95 वर्षाचे होते
रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बारसूच्या दिशेने रवाना
थोड्याच वेळात रिफायनरी विरोधकांची साधणार संवाद
विनायक राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे
बारसू भागात 144 कलम लागू असल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन ग्रामस्थांना भेटण्याची पोलीस देऊ शकतात
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झोडपून टाकलं आहे. वाशिम, मंगरुळपिर कारंजा,मानोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. यामुळे टमाटर, गहू,ज्वारी, भाजीपाला पिकांचे आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
राज्यातील तापमानाचा पार सध्या थोडा कमी झाला आहे. परंतु मे महिन्यात तापमान एप्रिलसारखे वाढणार का? याची चिंता नागरिकांना आहे. सध्या तरी एप्रिलचा शेवटचा आठवडा दिलासा देणार असणार आहे….सविस्तर वाचा
नवी दिल्लीत मथुरा रोडवरच्या डी पी एस स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल
प्रशासनाला आल्याने मोठी खळबळ
बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस शाळेत दाखल
शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती
जालना जिल्ह्यात ज्वारीची पेरणी यावर्षी कमी झाली आणि, त्यामुळे आता जनावरांचे खाद्य कडब्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्वारीची पेंढी सध्या 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे, पेंढ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.
एक किलो चांदीचा भाव 76,700 रुपये
सोने-चांदीत आठवडाभरापासून शांतता
सकाळच्या सत्रात किंमती किंचित वधारल्या
गेल्या दहा दिवसांत सोने-चांदी स्वस्त
गेल्या 11 वर्षांत भाव झाला दुप्पट, वाचा सविस्तर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून लाल वादळ पुन्हा रस्त्यावर रस्त्यावर उतरणार आहे. किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी असा लाँगमार्च काढण्यात येतोय. दुपारी ३ वाजेपर्यंत मोर्चाचे लोणीच्या दिशेने प्रस्थान होणार असले तरी सकाळपासूनच राज्यातील विविध भागातून शेतकरी आणि आदिवासी बांधव अकोले येथे जमण्यास सुरुवात झालीये. तीन दिवसात हा लाँगमार्च लोणी येथे पोहचणार असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यलयावर धडकणार आहे.
आज पुण्यात आजी माजी पालकमंत्री बैठकीत येणार एकत्र
कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार राहणार उपस्थित
पुणेकरांच्या पाणी प्रश्नावर आज निर्णय
पुण्याला उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होणार की कपात ?
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार बैठकीत एकत्र येणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे याविषयी त्याच्या पत्नीने देखील तिला हे सर्व मान्य असल्याचे सांगितले. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक गुराप्पा बंडगर आणि पत्नी पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
‘पोन्नियिन सेल्वन 2’च्या प्रमोशनदरम्यान ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाबद्दल झाली व्यक्त
चित्रपटात साकारलेल्या नंदिनीच्या भूमिकेविषयी ऐश्वर्याने सोडलं मौन, वाचा सविस्तर..
जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरीत महागले
या शहरात इंधन सर्वात महागडे
या शहरा खालोखाल इतर ठिकाणी भावाची काय स्थिती
जवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाचा भाव घ्या जाणून
भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, बातमी एका क्लिकवर
कामगारावर वीज कोसळतानाचे दृश्य CCTV कॅमेरात कैद
बाबुधनकुमार यादव असे मृत कामगाराचे नाव
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भद्रावती तालुक्यातील माजरी कोळसा खाणीत काम करतानाची घटना
या भागात विजांच्या कडकडाटासह झाला अवकाळी पाऊस
याच दरम्यान वीज पडून कंत्राटी कामगाराचा झाला दुर्दैवी मृत्यू
सावता नगर परिसरात आपसातील वादातून हत्या झाल्याची शक्यता
गँगवॉरच्या वर्चस्वावरून हत्या झाल्याचा संशय
गेल्याच आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यावर झाला होता गोळीबार
या घटनेशी संबंध आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू
साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा मुठा नदीचा प्रकल्प सुरू करण्यात येतोय
या प्रकल्पात येणाऱ्या दुर्मिळ 3 हजार झाडांचं जतन करणार
महापालिकेनं केलं स्पष्ट
6 हजार झाडांची तोड होणार म्हणून पर्यावरणप्रेमींनी घेतला आक्रमक पवित्रा
सलग तीन दिवस सापडले मोबाईल
तीन दिवसांत सहा मोबाईल, चार्जर आणि बॅटरी सापडल्या
मंगळवारी सायंकाळी कारागृहातील क्वारंटाईन सेंटरसमोर सापडले मोबाईल असलेले पार्सल
नारळाच्या आकाराच्या पार्सलमध्ये लपवले होते मोबाईल
बदलत्या वातावरणाचा फटका मिरचीला, दरात वाढ
यंदा लाल मिरची खाणार भाव
बाजारपेठेत मागणी मात्र उत्पादनात घट
अवकाळीमुळे लाल मिरचीला लागली बुरशी
यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर होणार पालखीचे प्रस्थान
पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयाग तीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सदगुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानी निवृत्तीनाथ महाराज पालखी करणार मुक्काम
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचे हे 750वे वर्ष
भाविकांच्या सोयी सुविधेसाठी, आरोग्यासाठी होणार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना
पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असल्याची संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षांची ग्वाही
– नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित.
– सहकारी संस्थांच्या मतदानासाठी 6 कक्ष तर ग्रामपंचायत मतदार संघासाठी 7 कक्ष याप्रमाणे एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित.
– 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत होणार मतदान.
– 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महसूल संघटनेच्या सभागृहात होणार मतमोजणी.
– एकूण 110 सहकारी संस्था आणि 223 ग्रामपंचायत संख्या.
पुणे – वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात होणाऱ्या वायुप्रदूषणावर उपाययोजना करा
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
शव दहन करण्यासाठी लाकडाऐवजी विद्यूत दाहीनीचा वापर वाढवा पालकमंत्र्यांच्या सूचना
स्मशानभूमी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारी आहेत
यासाठी चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतं यावर उपाययोजना करा अशा सूचना दिल्या आहेत.
– नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड.
– सलग 6 दिवस सुरू होती कारवाई.
– नाशिकमध्ये झाली राज्यातील सर्वात मोठी कारवाई
– बेहिशोबी मालमत्तेत राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते
– जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक
सकाळी 11.30 वाजता विनायक राऊत आंदोलकांची भेट घेणार
पोलीस बंदोबस्तात बारसूत माती परीक्षण होणार आहे, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे.
– नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र
– पाच तालुक्यांतील 47 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू
– 21 टँकरद्वारे नागरिकांची भागवली जात आहे तहान
– मे महिन्यात टँकरमध्ये आणखी वाढ होण्याची भीती
– नाशिक शहरात 45 दिवसांत अनधिकृत नळ कनेक्शन होणार अधिकृत
– 1 मे पासून 15 जूनपर्यंत राबवली जाणार मोहीम
– अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी मनपाची ‘अभय योजना’
– 1800 रुपये दंडात्मक शुल्क भरून नळ कनेक्शन करता येणार नियमित
– 15 जूननंतर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
269 कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे
राज्य सरकारने निधीला मंजूरी दिली आहे
14 मे पुर्वी काम सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत
यंदा शंभूसोहळा तुळापूर या ठिकाणी पार पडणार आहे
सरकारने छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखड्याला मंजुरी दिली आहे
स्पर्धेच्या उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आलं
यावेळी जय श्नीराम गाण्यावर मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला
वनजमीन, गायरान जमीन, तळ जमीन नावावर करा
दुधाला एमएसपी द्यावी विविध मागण्यांसाठी आज दुपारी निघणार मोर्चा
दुपारी 3 वाजता अकोले शहरातून होणार मार्चला सुरूवात
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयाकडे मोर्चाचे होणार प्रस्थान
तीन दिवस चालणार हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव
तीन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मोर्चेकऱ्यांचा महसूलमंत्र्यांच्या गावात महामुक्काम
महानगरपालिकेची नोटीस बजावण्याची तयारी, मनपा आयुक्तांच्या परवानगीची प्रतिक्षा
पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमूळे मनपा ऍक्शन मोडवर
जाहिरातीचे होर्डिंग असलेल्या संबंधित एजन्सीला मनपाने स्ट्रक्चरल स्ट्रक्चर झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले
सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास होऊ शकते कारवाई
अनेक होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता
बठिंडा येथील बादल गावात प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
आज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात बादल यांचं पार्थिव ठेवलं जाणार
प्रकाश सिंग बादल यांचं काल रात्री साडे आठ वाजता झालं होतं निधन, ते 95 वर्षाचे होते